शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 4 ऑक्टोबर 2018 (00:10 IST)

कमी व जास्त झोपेमुळे विविध आजारांचा धोका

चांगली आणि पुरेशी झोप आरोग्यासाठी अतिशय आवश्य समजली जाते. मात्र फार जास्त वेळ झोपणे आणि फार कमी झोपणेसुद्धा आरोग्यासाठी तेवढेच घातक ठरू शकते. एका अध्ययनातून हा खुलासा झाला आहे.
 
दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात त्यांनी दावा केला आहे की, दहा तासांपेक्षा जास्त वा सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यामुळे मटाबोलिक सिंड्रोम धोका उद्‌भवू शकतो. यामुळे हृदय विकार, पक्षाघात आणि मधुमेहाची जोखीम बळावू शकते. या अध्ययनात शास्त्रज्ञांनी रोज सहा ते सात झोप घेणार्‍या लोकांसोबत तुलना केल्यानंतर असे दिसून आले की, सहा तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍या लोकांना मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका जास्त होऊ शकतो. सहा तासांपेक्षा कमी झोप घेणार्‍या महिलांमध्ये अशाच प्रकारचा धोका दिसून आला. दहा तासांपेक्षा जास्त झोपण्याचा संबंधही मेटाबोलिक सिंड्रोमसोबत आढळून आला.