गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 29 जून 2024 (09:59 IST)

व्हिटिलिगो: कोड किंवा पांढरे डाग हा आजार कसा होतो? यावर काही उपाय आहेत का?

कोड किंवा पांढरे डाग हा त्वचेचा एक सामान्य आजार असूनही लोकांमध्ये आणि वैद्यकीय व्यावसायिकांमध्येही याची फारच कमी माहिती आहे.अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थनुसार, हा एक सामान्य आजार असून जगातील एकूण लोकसंख्येच्या 0.5 ते 1.0 टक्के लोक या आजाराने ग्रस्त आहेत.
 
मात्र अनेक प्रकरणे नोंदवली जात नसल्याने बे प्रमाण लोकसंख्येच्या 1.5 टक्के असू शकतं, असा काही संशोधकांचा असा अंदाज.या आजारात त्वचा (गडद रंग) आणि काही प्रकरणांमध्ये केस पांढरे होतात. कृष्णवर्णीय लोकांमध्ये हा आजार लवकर दिसून येतो.कोड संसर्गाने पसरत नाही. तरीही, यामुळं लोक चिंताग्रस्त झाल्याचं पाहायला मिळतं.

कोड म्हणजे काय?
स्त्री किंवा पुरुष कोणालाही या त्वचारोगाचा त्रास होऊ शकतो.हा एक क्रॉनिक आजार असून त्वचेवर पांढरे किंवा पिवळे डाग येतात, त्वचेच्या या भागातील मेलेनिन नष्ट होते.त्वचेच्या रंगद्रव्यासाठी मेलॅनिन जबाबदार असते, जे मेलेनोसाइट्स नावाच्या विशेष पेशींनी बनलेले आहे. त्वचेला रंग देण्याव्यतिरिक्त, मेलेनोसाइट्स त्वचेचे सूर्यकिरणांपासून संरक्षण करतात.पण, मेलेनोसाइट्स नष्ट झाल्यावर रंगद्रव्य निघून जाते आणि व्यक्तीला व्हिटिलिगो होतो.
 
हा आजार त्वचेच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. सामान्यतः सूर्यकिरणांच्या संपर्कात असलेल्या भागात होतो. जसं चेहरा, मान आणि हात.ही समस्या कृष्णवर्णीय त्वचा असलेल्या लोकांमध्ये अधिक दिसून येते आणि ती व्यक्तीपरत्वे बदलू शकते.
 
कोडाचे प्रकार
शरीराच्या कोणत्या भागात डिपिग्मेंटेशन होते, त्यावर अवलंबून दोन भाग केले जाऊ शकतात. या आजाराला व्हिटिलिगो देखील म्हणतात
सेगमेंटल: याला एकतर्फी व्हिटिलिगो देखील म्हणतात. हे सहसा लहान वयात दिसून येते, यात शरीराच्या फक्त एका बाजुला पांढरे डाग दिसतात.
एका पायावर, चेहऱ्याच्या एका बाजूला किंवा शरीराच्या फक्त एका बाजूला असू शकते.
 
या प्रकारच्या कोडाने ग्रस्त असलेले सुमारे निम्मे लोक त्वचारोग झालेल्या भागात केस गळण्याची तक्रार करतात.
नॉन-सेगमेंटल: बहुतेक लोकांमध्ये हा व्हिटिलिगोचा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामध्ये शरीराच्या कोणत्याही भागात पांढरे ठिपके तयार होऊ लागतात.
 
ॲक्रोफेशियल: चेहरा, डोके, हात आणि पाय यावर डाग दिसतात.
म्यूकोसल : तोंड आणि जननेंद्रियाच्या भागातील श्लेष्मल त्वचेवर परिणाम होतो.
युनिव्हर्सल : ही सर्वात गंभीर स्थिती आहे, परंतु दुर्मिळ देखील आहे. ते 80 ते 90 टक्के त्वचेवर पसरते.
 
या आजाराचा त्रास कोणाला होतो?
या आजाराने बाधित लोकांसाठी काम करणाऱ्या 'व्हिटिलिगो सोसायटी' या संस्थेच्या म्हणण्यानुसार, जगात 7 कोटी लोक या आजाराने त्रस्त आहेत आणि 20 ते 35 टक्के रुग्ण लहान मुलं आहेत.
कोड साधारणपणे वयाच्या 20 व्या वर्षाच्या आसपास दिसू लागते, पण ते कोणत्याही वयात होऊ शकते. हा आजार स्त्री किंवा पुरुष कोणालाही होऊ शकते.
 
हा एक ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे, केवळ 'कॉस्मेटिक' समस्या नाही.
कोड कशामुळे होतो हे अद्याप न उलगडलेलं कोडं आहे, परंतु हा संसर्ग नाही आणि एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकत नाही.या आजाराचं कारण माहिती नसल्यामुळे व्हिटिलिगोचे सुरुवातीचे डाग दिसल्यानंतर त्वचेवर किती परिणाम होईल हे सांगता येत नाही.आणि यामुळं त्वचेवर तयार होणारे पांढरे डाग कायमचे राहतात.
 
लक्षणे काय आहेत ?
कोडाची कोणतीही लक्षणं नाहीत, पण जर शरीरावरील डाग सूर्यप्रकाशापासून वाचवले नाहीत तर ते सूर्यप्रकाशात भाजले जाऊ शकतात.चेहरा, मान, हात किंवा गुप्तांगांवर पांढरे डाग दिसल्यास बाधित व्यक्तीला खूप मानसिक त्रास होऊ शकतो.ब्रिटीश असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्टच्या नीना गुड यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "व्हिटिलिगो हा एक असा आजार आहे ज्याचा मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा परिणाम होतो."
 
तज्ज्ञांच्या मते, काळी त्वचा असलेल्या लोकांमध्ये कोड स्पष्ट दिसून येत असल्यामुळं होणाऱ्या मानसिक त्रासाचा त्वचेच्या रंगाशी किंवा आजाराशी कोणताही संबंध नाही.
मात्र, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा हा आजार शरीराच्या बहुतेक भागांमध्ये पसरतो तेव्हा काही वांशिक गटातील कृष्णवर्णीय लोकांना त्यांची सांस्कृतिक ओळख गमावण्याच्या भीतीमुळे आणखी त्रास होऊ शकतो.
 
हा आजार कसा होतो हे सांगणं अशक्य आहे. काही लोकांना वर्षानुवर्षे त्वचेच्या डागांमध्ये कोणताही बदल दिसून येत नाही, परंतु काही प्रकरणांमध्ये हे डाग वेगाने पसरतात.कधीकधी पांढरे ठिपके असलेले रंगद्रव्य देखील परत येते, विशेषत: हे मुलांमध्ये होते.
 
यावर उपचार काय आहे?
सर्वसाधारणपणे, विशेषज्ञ कॉम्बिनेशन उपचारांची शिफारस करतात. त्यात फोटोथेरपी (अल्ट्राव्हायोलेट लाइट थेरपी) सोबत औषधोपचार आणि त्वचेवर कॉर्टिकोस्टिरॉईड्स लावण्याबाबत सल्ला दिला जातो.
परंतु कॉर्टिकोस्टिरॉईड्स 25 टक्क्यांहूनही कमी रुग्णांमध्ये प्रभावी असते. अल्ट्रावॉयलेट लाइटमुळे त्वचेच्या रंगात असामान्य बदल होतो आणि दीर्घकाळापर्यंत हे उपचार घेत राहिल्यास त्वचेचा कर्करोग होऊ शकतो.
नॉन-सेगमेंटल त्वचारोगाच्या उपचारांसाठी यूएस आणि युरोपियन युनियनने ओपझेलुरा नावाच्या औषधाला मान्यता दिली आहे.हे औषध मलमच्या स्वरूपात येते आणि त्वचारोगाने प्रभावित भागात थेट लावता येते.दिवसातून दोनदा वापरलेल्या जवळजवळ अर्ध्या रुग्णांनी लक्षणीय सुधारणा नोंदवली, सहापैकी एका रुग्णाने, पांढऱ्या डागांमध्ये रंगद्रव्य परत आल्याचं सांगितलं.
 
पण याबाबत अनेक मतभेदही आहेत. रोगप्रतिकारक शक्तीवर ते परिणाम करू शकते. पुरळ आणि जळजळ होऊ शकते. शिवाय, ओपझेलुराच्या एका ट्यूबची किंमत 2000 अमेरिकन डॉलर इतकी आहे.
याव्यतिरिक्त, जर्नल ऑफ डर्माटोलॉजीमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं म्हटलंय की, काळ्या मिऱ्यांतील तिखट चवीसाठी जबाबदार असलेल्या पिपेरिनमुळे रंगद्रव्य वाढते. यामुळे त्वचेतील मेलेनोसाइट्सचे उत्पादन वेगाने होते. मात्र, मेलेनोसाइट्स वाढण्याचा प्रयत्न केल्यास मेलेनोमाचा धोका वाढतो. हा त्वचेच्या कर्करोगाचा सर्वात घातक प्रकार आहे. त्यामुळे, या धोकादायक दुष्परिणामाशिवाय या आजारावर उपचार करण्यासाठी पिपेरिनचा वापर केला जाऊ शकतो की नाही हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
 
यूएस स्थित ग्लोबल व्हिटिलिगो फाउंडेशननं, हा आजार चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आणि नवीन उपचार पद्धती विकसित करण्यासाठी फारच कमी निधी दिला जातो, अशी तक्रार केली आहे.

Published By- Priya Dixit