शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (23:50 IST)

व्हर्टिगो म्हणजे काय

व्हर्टिगो ही एक मेडिकल कंडिशन असून त्यात रक्तदाब कमी होण्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. व्हर्टिगोचा अर्थ चक्कर येणे, फिरणे. या स्थितीत रूग्णाला चक्कर येते. डोकेदुखीबरोबरच चक्कर येते आणि तोल जातो. डोळ्यासमोर अंधारी येऊ लागते. अशावेळी रक्तदाब कमी होण्याची भीती असते. व्हर्टिगोचा परिणाम दीर्घकाळही राहू शकतो आणि कमी कालावधीतही असू शकतो.
 
व्हर्टिगोचे लक्षणे
अस्थिर किंवा असंतुलित जाणवणे, उंचीची भीती वाटणे, कमी ऐकू येणे, पडण्याची भीती वाटणे, अधिक आवाजाने डोकेदुखी, चक्कर येणे. व्हर्टिगोची समस्या ही साधारण व्यायामातूनही दुरूस्त करता येऊ शकते. 
 
कोणत्या कारणांमुळे व्हर्टिगोचा त्रास होऊ शकतो आणि त्यावरील उपाय ...
बीपीपीव्ही
बिनाइन पॅराऑक्सिमल पोझिनशनल व्हर्टिगो म्हणजेच बीपीपीव्ही. यात कानातील शिरात कॅल्शियम कॉर्बोनेटचा कचरा जमा होतो. वयस्क रुग्णांत बीपीपीव्हीचे कारण अधिक असते.
 
मेनियार्स
मोनियार्स व्हर्टिगो हा कानाच्या आतील भाग आहे. तो ऐकण्याच्या शक्तीवर परिणाम करतो आणि कानात आवाज येत राहतो. त्यामुळे काही तासांत चक्कर येण्याची शक्यता राहाते. कानात साचलेल्या पाण्यामुळे हा त्रास होतो.
 
वेस्टीब्यूलर मायग्रेन
वेस्टीब्यूलर व्हर्टिगोचे कारण सामान्य आहे. चक्कर येणे, डोकेदुखी होणे हे सामान्य लक्षणे आहेत. ते सर्वांत दिसतात. यात रुग्ण हा अति प्रकाश आणि आवाज सहन करु शकत नाही.
 
लेब्रिथिनायटिस
ही एक कानातील समस्या आहे ती सर्वसाधारपणे संसर्गाशी निगडीत आहे. हा संसर्ग शीरेजवळ कानात सूज येण्यास कारणीभूत ठरू शकते. याकारणामुळे बहिरेपणा येण्याचा धोका असतो.
 
उपचार
एखाद्या व्यक्तीला अशक्तपणा, चक्कर किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थेरपीच्या मदतीने रूग्णाची चक्कर येण्याची समस्या दूर होऊ शकते.
 
डॉ. संतोष काळे