बुधवार, 16 एप्रिल 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 15 एप्रिल 2025 (07:00 IST)

स्टेज झिरो कॅन्सर म्हणजे काय? त्याचे लक्षण काय आहे

कॅन्सर किंवा कर्करोग हा जीवघेणा आजार आहे.याचे नाव जरी समोर आले की घाबरायला होत. अलीकडेच सोहा अली खान हिने ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टॅगोर यांना स्टेज झिरो कॅन्सरमुळे त्यांच्या उपचारांना खूप मदत झाली असे सांगितले. अखेर स्टेज झिरो कॅन्सर म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि त्यावरील उपचार काय आहे. चला जाणून घेऊ या.
यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मते , "ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये असामान्य दिसणाऱ्या पेशी तयार होतात ज्या कर्करोगाच्या ऊतींसारख्या दिसतात, परंतु ज्या ठिकाणी त्यांची सुरुवात झाली त्याच ठिकाणी राहतात. या पेशी शरीराच्या इतर भागात पसरत नाहीत. परंतु कालांतराने, त्या कर्करोगाच्या रूपात बदलू शकतात आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरू शकतात. या स्थितीला 'स्टेज झिरो' रोग किंवा कर्करोग म्हणतात. हा शरीराच्या वेगवेगळ्या भागात होऊ शकतो."
गर्भाशय ग्रीवा, फुफ्फुसे किंवा पोटाच्या मार्गात - याला एडेनोकार्सिनोमा इन सिटू म्हणतात .
स्तनात - याला डक्टल कार्सिनोमा इन सिटू म्हणतात .
त्वचा, तोंड किंवा घशात - याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा इन सिटू म्हणतात .
याला दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते: कार्सिनोमा इन सिटू .
स्टेज झिरो कर्करोगाची लक्षणे 
स्टेज झिरो कॅन्सरची कोणतीही दृश्यमान लक्षणे दिसत नाहीत. कर्करोगावर संशोधन करणारे अद्याप त्याच्या लक्षणांबद्दल स्पष्ट माहिती देऊ शकलेले नाहीत. म्हणूनच तुम्हाला स्टेज झिरो कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसत नाही. पण काही वैद्यकीय चाचणीमुळे ही लक्षणे शोधता येते. झिरो स्टेज चा कॅन्सर आढळल्यावर लगेच उपचार सुरु करता येते. या स्टेजवरील कॅन्सर लवकर बरा होण्याची दाट शक्यता असते.  
झिरो स्टेजच्या कॅन्सरच्या पेशी लवकर उपचार घेतल्यास शरीरात पसरत नाही. यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री फुफ्फुसांच्या कर्करोगातून लवकर बऱ्या झाल्या. 
Edited By - Priya Dixit