बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (16:23 IST)

आपले आरोग्य आपल्या हातात...

* आपण 20 रुपये किलो टोमॅटो घेऊन त्याची चटणी खाऊ शकतो, पण ते न करता आपण 250 रुपये किलोचे टोमॅटो सॉस खातो तेही सहा महिने आधी बनविलेले, शिळे.
* घरी आपण आज सकाळी भरलेले पाणी दुसर्या  दिवशी पीत नाही, पण 3 महिने जुन्या बॉटलमधील पाणी 20 रुपये देऊन पितो.
* 50 रुपये लीटर दूध महाग वाटते, पण 70 रुपये लीटरचे कोल्ड्रिंक्स तेही 2 ते 3 महिने जुने आपण पितो.
* आपल्या शरीराला ताकद देणारे 200 रुपयाला पावकिलो मिळणारे ड्राय फ्रुट्‌स आपल्याला महाग वाटतात, पण 400 रुपयाला मिळणारे मैद्यापासून बनलेला पिझ्झा आवडीने खातो.
* बहुतेकजण सकाळी घरात शिजवलेले अन्न संध्याकाळी खात नाही, पण काही कंपन्यांचे सहा-सहा महिने जुने असलेले खाद्यपदार्थ आपण खातो, जेव्हा की आपल्याला माहीत असते हे खाद्यपदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह मिक्स  करतात, जे आपल्या आरोग्यास घातक असतात.
 * या सात-आठ महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात आपल्याला चांगले समजलेले आहे की बाहेरच्या जंकफूड किंवा  हॉटेलमधील खाण्याशिवाय आपण छान जगू शकतो, घरातील शुद्ध, सकस अन्न खाऊ शकतो. ज्याने आपले आरोग्सुद्धा चांगले राहण्यास मदत होते. आठवून बघा मागच्या सात-आठ महिन्यांमध्ये तुम्ही कितीवेळा आजारी पडलात?