शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

कॅल्शिअमची कमतरता? करून पहा हे सोपे उपाय

आधुनिक जीवनशैलीत अधिक प्रमाणात शुगर (चॉकलेट, केक, आइसक्रीम, थंड पेय) घेण्याने कॅल्शिअमची कमतरता आढळते. ही समस्या आजकाल सामान्य होत चालली आहे. फक्त प्रौढच नव्हे तर तरुण मुलेही याचे बळी पडत आहे. वर्षानुवर्ष कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्यानंतरही परिणाम निराशाजनक दिसत आहे.
 
कॅल्शिअम कमतरतेचे लक्षणे
 
* हाडे पोकळ होणे, दुर्बल होऊन तुटणे
कंबर वाकणे
दात गळणे
मुलांना उशिरा दात येणे
शरीरात अशक्तपणा असणे, इत्यादी


कॅल्शिअम कमतरतेचे कारण
 
* पचनशक्ती कमजोर झाल्याने जेवणातून कॅल्शियमचे शोषण कमी होणे
रोजच्या जेवण्यात कॅल्शियमयुक्त पदार्थांची कमी
बायकांना मासिक पाळीत अधिक स्त्राव होणे
नवजात बालकांमध्ये स्तनपानाचा अभाव
ऊन, शारीरिक श्रमाचा अभाव
अधिक प्रमाणात गोड पदार्थाचे सेवन करणे


कॅल्शिअमयुक्त खाद्य पदार्थ
 
* धान्य: गहू, बाजरी व नाचणी
मूळ व कंद: नारळ, रताळे
दूध: दूध व दुधाचे सर्व पदार्थ
डाळी: मूग डाळ, सोयाबीन, वटाणे, मटकी, राजमा
हिरव्या भाज्या: कढीपत्ता, कोबी, अरवीची पाने, मेथी, मुळ्याची पाने, पुदिना, कोथिंबीर, काकडी, गवार, गाजर, भेंडी, टोमॅटो
मेवे: मनुका, बदाम, पिस्ते, अक्रोडाचे तुकडे आणि खरबुजाच्या बिया
फळं: नारळ, आंबा, जाम, सीताफळ, संत्रं, अननस
मसाले: ओवा, जिरे, हिंग, लवंगा, कोथिंबीर, मिरपूड


 
हे सर्व प्राकृतिक रूपात कॅल्शिअम देणारे पदार्थ आहे. हे पदार्थ त्वरित अवशोषित केले जातात. आईचं कॅल्शिअमयुक्त दूध मुलांसाठी सर्वोत्तम आहे. याने तान्ह्या बाळांना कॅल्शिअमचा पुरवठा होत असतो आणि हे इतर रोगांपासून त्यांचे रक्षणही करतं. शरीराला दररोज 0.8 ते 1.3 ग्राम कॅल्शियमची आवश्यकता असते.