शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

कोड आजारांना घाबरूनका!

कोड (पांढरे डाग) हे एक कोंड मुळीच नाही. भीती बाळगण्याची मुळीच गरज नाही. कोड काय आहे हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे जनमाणसांत असणारी भरती आपोआपच दूर होण्यास मदत होईल. आपल्या शरीरावरील कातडी अत्यंत पातळ असून काचेसारखी पारदर्शक आहे. आतील मांसळ भागावर पांढर्‍या रंगाचे पातळ आवरण असून वर कातडीचे कव्हर असते. ह्यात एक नैसर्गिक पोकळी असून त्यात रंगद्रव्य भरलेले असल्यामुळे आतील भाग दिसत नाही. शिवाय कातडीस रंग असतो. आपल्या आहारात निषिद्ध आहार खाण्यात गेला तर त्यापासून शरीरात विषाणू तयार होऊन ते रक्तात मिसळतात आणि ह्या रंग द्रव्याला खातात. त्यामुळे आतील पांढराभाग कातडीतून दिसू लागतो. ह्यालाच पांढरे डाग, कोड, श्वेतुष्ठ म्हणतात. 

आयुर्वेदात याला श्वेतकुष्ठ म्डणात. त्याचे 3-4 प्रकार आहेत. कोड हा अनुवंशिक नाही. पण काही ठिकाणी नियमास अपवाद असतो. स्पर्श जन्य तर मुळीच नाही. तो बरा होत नाही हा गैरसमज आहे. आयुर्वेदामध्ये उत्तम प्रकारची औषधोपचार पद्धती आहे. योग्य आहाराचे नियोजनन, नियमित आणि योग्य औषधोपचार ह्याद्वारे कोड पूर्णपणे बरा होतो. परंतु यासाठी अनुभवी वैद्याकडून योग्य आणि दीर्घकाळापर्यंत उपचार करून घ्यावा लागतो.

बाजीराव नारायणराव