शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 13 जुलै 2020 (22:25 IST)

आपल्याला देखील महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते का? जाणून घेऊ या ही 5 कारणे...

सहसा बायकांना 21 ते 35 दिवसाच्या आतच पाळी येते,पण बर्‍याचवेळा काही बायकांना याच कालावधीत दोन वेळा पाळी येऊन जाते. पुन्हा पुन्हा मासिक पाळी येण्याची बरीच कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ या अश्या कारणांबद्दल ज्यामुळे बायकांना एकाच महिन्यात दोन वेळा मासिक पाळीच्या समस्येतून जावं लागत.

 1. जर एखादी बाई किंवा स्त्री गरोदर आहे, त्यावेळी तिच्या शरीरात बरेचशे हार्मोनल बदल होतात, जेणे करून तिची पाळी अनियमित होते आणि नंतर पाळी येणं बंद होतं.
2. जर एखादी बाई किंवा स्त्री जास्त तणावात आहे, तर त्याचा थेट प्रभाव आपल्या मासिक पाळीवर होतो. ताण तणावामुळे रक्तात स्ट्रेस हार्मोन वाढून जातात आणि या कारणास्तव मासिक पाळी खूप लांब किंवा कमी असू शकते.
3. जर एखादी स्त्री किंवा बाई गर्भ निरोधक गोळ्या घेत असेल तरीही पाळी अनियमित होण्याची शक्यता जास्त असते. 
4. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या शरीरात हार्मोन असंतुलित होतात, तरी ही पाळीचे असंतुलन होणे साहजिक आहे. 
5. बऱ्याच वेळा आजारपणामध्ये घेतलेल्या औषधांचे देखील हार्मोन्सवर परिणाम होऊ शकतात. जेणे करून पाळी लवकर किंवा उशिरा येऊ शकते.