मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By नेहा रेड्डी|
Last Updated : सोमवार, 4 मे 2020 (12:26 IST)

कोरोना व्हायरस : आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवतो काढा

कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती मजबूत असायला हवी. सध्या संपूर्ण जग कोरोनाव्हा यरस मुळे हैराण झाले आहे. या पासून कसे मुक्त होता येईल संशोधक ह्याचाच शोध लावतात आहे. त्याचं बरोबर आपल्या प्रतिकार शक्तीला कसे वाढविता येईल ह्याचावर काम चालू आहे. त्यासाठी काढ्यांचा वापर करण्याचा सल्ला दिला जात आहे आणि त्या प्रमाणे काढापण घेतला जात आहे. यामुळे सर्दी पडसं, ताप, घसा खवखवणे, घशा दुखणे सारख्या त्रासांपासून मुक्ती मिळू शकते.
 
मध्यप्रदेशाची सरकार लोकांच्या प्रतिकार शक्तीला वाढविण्यासाठी घरो घरी काढ्याचे वितरण करत आहे. ह्याचे सेवन करून रोगांशी लढायला मदत मिळेल. या काढ्या पासून कसे काय आपले रक्षण होवू शकते ?  कसे ते आपली प्रतिकार शक्ती वाढवतात ? याचा काय फायदा होणार ? आपल्या आहारात त्याचं समावेश कसे काय करावं ? या सर्व प्रश्नाच्या समाधानासाठी आम्ही आहारतज्ज्ञ पायल परिहारांशी संवाद साधला आणि ह्या काढ्याचे गुण आणि फायदे जाणून घेतले. जाणून घेऊ या हा काढा आपल्यासाठी किती फायदेशीर आहे....
 
आहारतज्ज्ञ आणि डायबिटीज स्पेशालिस्ट पायल परिहार यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याप्रमाणे काढ्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य - पिंपळ, सुंठ, काळे मिरे, तुळशीची पाने आणि 1 लीटर पाणी.
काढा बनविण्याची कृती : पिंपळ, सुंठ आणि काळे मिरे सम प्रमाणात मिसळून ह्याची बारीक भुकटी बनवावी. या तिन्ही पदार्थापासून तयार केलेले हे त्रिकूट चूर्णाला 1 लीटर पाण्यात 3 ते 4 तुळशीचे पानं घालून पाण्याचे प्रमाण अर्धे होयपर्यंत उकळून घ्यावे. दिवसभरातून 1 - 1 कप कोमट काढ्याला 3 - 4 वेळा प्यायला हवे. 
 
आहारतज्ज्ञ सांगतात की कुठल्याही रोगाशी लढण्यासाठी आपली रोग प्रतिकार शक्ती चांगली असायला हवी. हा काढा त्यासाठी फायदेशीर आहे. या साठी पिंपळ, सुंठ आणि काळे मिरे वापरले आहे. 
 
त्या सांगतात की पिंपळाची साल आणि पिंपळ पाने आयुर्वेदात बऱ्याच काळापासून वापरण्यात आहे. ह्याचा फायद्याविषयी बोलायचे झाले तर पिंपळ पोटदुखी आणि चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी वापरले जाते. पिंपळामध्ये अँटिमायक्रोबियल आढळतात जे शरीरात जाऊन सूक्ष्म जंतांना वाढू देत नाही. काळी मिरीने अन्नाची चव तर वाढतेच. त्याच बरोबर त्यामध्ये अनेक गुणधर्म आहेत. 
 
काळी मिरी मध्ये अँटीऑक्सीडेन्ट आढळून येते. ज्यामुळे आपली प्रतिरोधक शक्ती बळकट होते. अँटी ऑक्सीडेन्ट मिळविण्यासाठी हे चांगले स्रोत आहे. घसा दुखणे, घसा खवखवणे, टॉन्सिल्स सारख्या त्रासांपासून मुक्ती मिळविण्यासाठी काळीमिरीचा वापर आवर्जून केला जातो. आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने काळीमिरी जास्त प्रमाणात वापरली जाते आणि काढा करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. 
 
सुंठ बद्दल सांगायचे म्हणजे आलं चांगले प्रकारे वाळविल्यानंतर ते सुंठ बनते. सुंठाचा वापर सुद्धा काढ्यामध्ये केला आहे. ह्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सीडेंट असतात. याला अँटिमायक्रोबियल थेरेपी सुद्धा म्हणतात. काळीमिरी, सुंठ, पिंपळ मध्ये व्हिटॅमिन के आढळते जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. ह्यामुळेच काढ्यामध्ये या तिन्ही वस्तूंचा समावेश असतो. 
 
तुळशीचे धार्मिक महत्व तर आहेच त्याच बरोबर आरोग्यासाठीदेखील तुळस फायदेशीर आहे. तुळशीमध्ये उपचारात्मक वैशिष्ट्ये पण भरपूर आहे. अनेक रोगांच्या उपचारासाठी तुळशीचा वापर केला जातो. 
 
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अति प्रमाणात काहीही केले तर त्याचा त्रास होतोच त्याच प्रमाणे या काढ्याच्या अति सेवन केल्याने हे आपल्या साठी नुकसानदायक ठरू शकते. काढ्याला योग्य प्रमाणातच घ्यायला हवे. आपण या आरोग्यवर्धक काढ्याला दिवसांतून 3 - 4 वेळा घ्यायला हवे या शिवाय आपण कोमट पाण्यात दालचिनी टाकून प्यायल्याने घशाच्या वेदनेपासून त्वरित मुक्ती मिळू शकते.