रागावर ताबा ठेवण्यासाठी 7 उत्तम उपाय
राग येणे खूप सामान्य समस्या आहे. एकाला राग आला की इतर लोकांना राग झेलावा लागतो. स्वत:च्या या सवयीचा कंटाळ आला असेल आणि सुचत नसेल की कशा प्रकारे कंट्रोल करावा तर जाणून घ्या काही सोपे उपाय
ज्यामुळे आपलं संबंधही बिघडणार नाही आणि वेळ सांभाळून घेता येईल.
राग येण्याचं मुख्य कारण आहे ताण, आता ताण दूर करण्यासाठी स्नायूंना रिलॅक्स करा. खोल श्वास घ्या आणि दोन मिनिटांसाठी अगदी गप्प बसा, काही सेकंदातच आपण शांत व्हाल.
आपले डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या. आता विचार करा की ताण दूर होतोय. आपल्या विचार शक्तीने ताण आपोआप दूर होईल.
परफ्यूम देखील एक पर्याय आहे, हे ऐकून हैराण व्हाल पण सुगंधामुळे ताण दूर होतो. आपण ताज्या फुलांचा सुवास घेऊ शकता किंवा इतर कोणत्याही सुगंधामुळे आपला ताण दूर होईल.
राग कमी करण्यासाठी गार पाणी प्यावं आणि उलट गणना करणे सुरू करावे. हा उपाय नक्कीच काम करेल. या व्यतिरिक्त सकारात्मक विचार मनात आणावे आणि मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा.
कॉमेडी बघणे, वाचणे, ऐकणे, याने काही मिनिटातच आपला राग नाहीसा होईल. हास्य जीवनातील भाग असणे आवश्यक आहे.
पायी फिरणे, व्यायाम, योगा, किंवा कोणत्याही शारीरिक व्यायामामुळे ताणमुक्त होऊन राग दूर ठेवता येईल. पण हे नियमित असावे.
मेडिटेशन अर्थात ध्यान ताणमुक्त राहण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हे टॉनिकप्रमाणे काम करतं आणि मन शांत ठेवण्यात मदत करतं. याने मानसिक क्षमता देखील वाढते.