गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 7 सप्टेंबर 2023 (10:20 IST)

Sugar Under Control शुगरवर कंट्रोल ठेवण्यासाठी हे टाळा

Avoid these to keep your sugar under controlडायबेटिसच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत विशेष पथ्य पाळणे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचे अत्यंत महत्त्वाचे असते. शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. त्यासाठीच या टिप्स – 
 
* साखरयुक्त पदार्थ, मध, सरबत, सीरप, कोल्ड ड्रिंक्स, गूळ, तुप, केक, पेस्ट्री, आईसक्रीम, दारू, बीयर आदींचे डायबेटिस झालेल्या रुग्णांनी सेवन करू नये. 
 
* ज्या भाज्या जमिनीत येतात, उदा. बटाटे, रताळू, इत्यादी भाज्या खाणे टाळाव्यात.
 
* केली, चीकू, आंबा, सीताफल, द्राक्ष, पपई, पेरू, ऊस आदी फळे वर्ज्य करावीत. 
 
* काजू, मनुका, बदाम, भुईमुगांच्या शेंगा, अख्रोड आदी सुकामेवा टाळावा.
 
*  मांसाहर टाळावा.
 
*  भात, वरण, दूध, पनीर, दही, मासे विचडा आदी पदार्थ कमी प्रमाणात खावेत. 
 
*  कच्च्या भाज्या उदा. मेथी, पालक, दूधी भोपळा, मुळा, कोथिंबिर, गोभी, चवळी, टमाटर, कांदा, कारले, कांद्याची पात, कैरी, लिंबू पाणी आदी पदार्थ भरपूर प्रमाणात खावे.
 
विशेष फायदेशीर
 
* कारले, कडूलिंब, मेथीदाना यांचा काढा दररोज प्यावा. 
 
* सकाळच्या पहरी मोकळ्या हवेत फिरावे. 
 
* जास्त तणावात राहू नये. 
 
* जागरण कमी करावे.