मंगळवार, 4 मार्च 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (10:07 IST)

आयुर्वेदिक औषधी अश्वगंधाचे गुणधर्म जाणून घ्या

आयुर्वेदात अशा बऱ्याच औषधी वनस्पतींचा उल्लेख केला आहे ज्यांचा नियमितपणे वापर केल्याने बऱ्याच जीवघेण्या आजारांपासून सुरक्षित राहू शकता. आयुर्वेदात अश्वगंधामध्ये अँटी ऑक्सीडेन्ट, लिव्हर टॉनिक, अँटी इन्फ्लमेन्टरी, अँटी बेक्टेरिअल सह अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यात मदत करतात. या शिवाय या मध्ये अँटी स्ट्रेस गुणधर्म असतात जे स्ट्रेस फ्री ठेवण्यात मदत करतात. या व्यतिरिक्त हे दूध किंवा तुपामध्ये मिसळून सेवन केल्याने वजन वाढण्यात मदत मिळते. चला तर मग अश्वगंधा चे गुणधर्म जाणून घ्या.
 
* अश्वगंधाचे सेवन कसे करावे -
अश्वगंधाचे सेवन प्रमाणात करावे. अधिक प्रमाणात सेवन केल्याने उलट्यांचा त्रास होतो तसेच पोट देखील बिघडते. कमी रक्तदाबाच्या रुग्णांनी ह्याचे सेवन करू नये. झोप येत नसेल तर अश्वगंधाचा वापर काही प्रमाणात योग्यरीत्या करावे पण झोप येण्यासाठी ह्याचा वापर नियमितपणे करणे हानिकारक होऊ शकतो. बाजारपेठेत हे बऱ्याच रूपात उपलब्ध आहे. परंतु अश्वगंधा ची पूड म्हणून ह्याचा वापर जास्त प्रमाणात करतात. अश्वगंधाचे चूर्ण खाण्याची पद्दत खूप सोपी आहे. पाणी मध किंवा तुपात मिसळून घेऊ शकतो. या शिवाय, अश्वगंधा कॅप्सूल, अश्वगंधा चहा आणि अश्वगंधाचे रस देखील बाजारपेठेत आणि ऑनलाईन सहजपणे मिळतात.
 
* अश्वगंधाचे फायदे -
 
* कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारात देखील अत्यंत प्रभावी आहे. बऱ्याच संशोधनात असे आढळून आले आहे की अश्वगंधा कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून रोखतो आणि कर्करोगाच्या नव्या पेशींना बनू देत नाही. हे शरीरात रिऍक्टिव्ह ऑक्सिजन स्पिशिज चे निर्माण करतो. जे कर्करोगाच्या पेशींचा नायनाट करून आणि किमोथेरपीमुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासून संरक्षण करण्याचे कार्य करतो.
 
* अश्वगंधा मध्ये असलेले ऑक्सीडेन्ट प्रतिकारक शक्तीला बळकट करण्याचे काम करतो. अश्वगंधा पांढऱ्या रक्त पेशी आणि लाल रक्त पेशींना वाढविण्याचे काम करतो. जे अनेक गंभीर शारीरिक समस्यांसाठी फायदेशीर आहे.
 
* हे मानसिक ताण सारख्या गंभीर समस्यांना दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. एका अहवालानुसार अश्वगंधाचा वापर करून तणावाला 70 टक्के कमी केले जाऊ शकतो.वास्तविक हे शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्यात प्रभावी आहे. या मुळे चांगली झोप येते. अश्वगंधा बऱ्याच समस्यांना दूर करण्यात योग्यरित्या काम करतो.
 
* अश्वगंधाचा वापर डोळ्यांची दृष्टी वाढविण्यासाठी केला जातो. दररोज दुधासह घेतल्याने डोळ्यांव्यतिरिक्त तणाव देखील टाळता येऊ शकतो.