सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शनिवार, 26 डिसेंबर 2020 (09:56 IST)

अधिक व्यायाम करणे देखील नुकसानदायक होऊ शकतं

जास्त व्यायाम करणे हे नुकसानदायी होऊ शकतं त्याच्या पासून होणाऱ्या नुकसाना बद्दल माहिती घेऊ या. 
 
हे तर सर्वांना माहीत आहे की आपल्या शरीराला निरोगी अन्नाचे सेवन करणे व्यायाम करणे फायदेशीर आहे. दर रोज व्यायाम केल्याने वाढत्या वजनाला नियंत्रित करून शरीराला तंदुरुस्त ठेवू शकतो. बरेच लोक अधिक व्यायाम करू लागतात असे विचार करून की असं केल्यानं ते लवकर तंदुरुस्त होतील. असं केल्याने फायदा होत नसून तोटेच होतात.जर आपण स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करता आणि बऱ्याच वेळा असा विचार करून व्यायाम करता की या मुळे आपल्याला फायदाच होईल तर असे नाही होणार केवळ नुकसानच होईल.
 
स्वास्थ्य तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की जे लोक अति व्यायाम करतात त्यांना बऱ्याच प्रकारचे आजार होतात. अति व्यायामामुळे थकवा, झोप न येण्यासारखे त्रास उद्भवतात. जर आपण दररोज व्यायाम करता तर ते मर्यादित करावे. ज्यामुळे आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही. आज आम्ही सांगत आहोत की अति व्यायामामुळे काय नुकसान होऊ शकतात. चला तर मग जाणून घ्या.
 
* हृदयाला धोका संभवतो -
अति व्यायाम केल्यानं सर्वात जास्त धोका हृदयाला होऊ शकतो. संशोधकांनी सांगितले आहे की एका संशोधनात हे आढळून आले आहे की अति व्यायाम केल्यानं हृदयाच्या ऊतींना जखमा होऊ शकतात. या शिवाय हृदयाच्या स्नायू देखील कमकुवत होतात. जास्त वेळ व्यायाम केल्याने हृदयाचे ठोके वाढतात आणि हृदयाशी संबंधित आजार होतात.म्हणून जास्त व्यायाम करू नये.
 
* ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम -
स्वास्थ तज्ज्ञ सांगतात की जास्त व्यायाम केल्यानं ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोम होऊ शकतो. बऱ्याच वेळा लोक ब्रेक आणि रिकव्हरी शिवाय व्यायाम करतात ज्यामुळे फिटनेस पातळी कमी होते आणि दुखापतीची शक्यता वाढते. जास्त वजनी आणि अति व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त होत नाही तर हे हानिकारक देखील असू शकतो.
 
* रोग प्रतिकारक शक्तीवर परिणाम -
जास्त व्यायाम केल्यानं प्रतिकारक शक्ती वर विपरीत परिणाम होऊ शकतो. खरं तर व्यायाम करण्यासाठी अधिक ऊर्जा ची गरज असते. जर आपण जास्त व्यायाम करता तर ह्याचा परिणाम थेट रोग प्रतिकारक प्रणाली वर होतो.रोग प्रतिकारक प्रणाली वर परिणाम झाल्यामुळे त्वरित संसर्ग होऊ शकतो. अशा प्रकारे व्यक्ती रोगाला बळी पडू शकतो.
 
* स्नायूंना वेदना होते -
सामान्य दैनंदिनीच्या व्यायामामुळे होणारी वेदना 1 ते 2 दिवसातच बारी होते पण जर आपण जास्त व्यायाम करता किंवा जास्त प्रमाणात वजन उचलता तर आपल्या स्नायूंमध्ये बऱ्याच काळ वेदना होऊ शकतात. या मुळे आपण आजारी होऊ शकतो, म्हणून अति जास्त व्यायाम करणे टाळा.
 
* थकवा येऊ शकतो - 
अति जास्त व्यायाम केल्यानं थकवा देखील येऊ शकतो.या मुळे आपण कोणतेही काम योग्यरीत्या करू शकत नाही. थकवा आल्यामुळे आपण आजारी पडू शकतो. जास्त प्रमाणात किंवा सतत व्यायाम केल्यामुळे शरीरातील कॅलरी कमी होते, पण हे आपल्या शरीराची ऊर्जा कमी करते, या मुळे आपण स्वतःला थकलेले अनुभवता.
 
* झोप न येणं -
अति जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानं फक्त शरीरात वेदनाच होत नाही तर झोप देखील नाहीशी होते. बऱ्याच लोकांना जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानं रात्री अस्वस्थपणा जाणवतो आणि ते स्वस्थ झोपू शकत नाही. बऱ्याच वेळा शरीरात होणारी वेदना देखील त्यांना शांत झोपू देत नाही. जर आपण चांगली झोप इच्छिता तर मर्यादित काळा पर्यंतच व्यायाम करा.