रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (18:30 IST)

काय सांगता, मायग्रेन च्या समस्ये मध्ये सोयाबीन फायदेशीर आहे

भारतातील बऱ्याच क्षेत्रात सोयाबीनची लागवड केले जाते. सोयाबीनचे दोन प्रकार आहे. बरेच लोक सोयाबीनचे तेल देखील वापरतात. सोयाबीनचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल आहे.
सोयाबीन मध्ये बरेच पोषक घटक आढळतात, जे केस,त्वचा आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे चवीला देखील चांगले असते. ज्यामुळे हे बऱ्याच प्रकारच्या खाद्य पदार्थांमध्ये वापरतात. सोयाबीन हे मायग्रेन आणि इतर समस्यांमध्ये देखील फायदेशीर आहे. 
 
* मायग्रेनचा उपचार- 
ज्या लोकांना मायग्रेनचा त्रास असतो किंवा ज्यांना खूप जास्त प्रमाणात डोकेदुखीचा त्रास असतो, त्यांना नियमितपणे सोयाबीनचे सेवन केले पाहिजे. सोयाबीन मध्ये फोलेट आढळतो, जे मेंदूला सहजपणे चालविण्यात मदत करतो. या शिवाय जर तणाव आणि नैराश्याला बळी गेलेला असाल तरी देखील नियमानं सोयाबीनचे सेवन करावे.
 
* केसांसाठी  फायदेशीर -
सोयाबीनच्या सेवनाने केस चमकदार आणि मऊ बनतात. सोयाबीनने हेयर मास्क देखील बनवतात जे केसांसाठी खूप चांगले आहे. तीन महिने केसांना सोयाबीनचे रस लावावे ज्यामुळे केस एकदम छान दिसतात. जेवणात सोयाबीन समाविष्ट केल्याने आरोग्याचे लाभ मिळतात. जर आपण केसांना सोयाबीन लावू इच्छित नसाल तर अन्नात ह्याचे सेवन करा.
 
* नखे मजबूत करतात -
ज्या लोकांची नखे कमकुवत असतात, त्यांनी सोयाबीनचे सेवन करावे. पिवळे आणि कमकुवत नखे लोकांसाठी त्रासदायी असतात. किमान सहा महिन्या पर्यंत सोयाबीनचे नियमितपणे सेवन केल्याने नखे मजबूत होतात. सोयाबीन नखांना ओलावा देतो. सोयाबीनच्या रसात नखे बुडवून ठेवल्यानं नखांशी निगडित प्रत्येक समस्येपासून सुटका होते.
 
* उच्च रक्तदाबापासून सुटका-
शरीरात सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेमुळे रक्तदाबाचे त्रास होतात. उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी  पोटॅशियम समृद्ध असलेला आहार घ्यावा. या मध्ये पोटॅशियम आढळते जे रक्तदाब संतुलित ठेवतो. म्हणून न्याहारी किंवा जेवण्यात सोयाबीनला समाविष्ट करावं. असं केल्यानं वारंवार उच्च रक्तदाबाचा त्रास होणार नाही.