दातासह जीभ देखील स्वच्छ करा, अन्यथा हे त्रास होऊ शकतात
हे तर सर्वांनाच माहीत आहे की दात घासणे त्यांना स्वच्छ ठेवणे आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर प्रथम दात स्वच्छ करतो म्हणजे ब्रश करतो. पण काही लोक असे ही आहेत जे केवळ दातच स्वच्छ करतात जीभ नाही. जेवढे आवश्यक आहे दातांची स्वच्छता करणे तेवढीच आवश्यक आहे जीभेची स्वच्छता करणे. अशा परिस्थितीत जर आपण नियमितपणे जीभ स्वच्छ करत नाही तर बऱ्याच रोगाने ग्रासले जाता ज्याची आपल्याला माहितीच नसते. आज आम्ही सांगत आहोत की जीभ स्वच्छ न केल्याने काय परिणाम होऊ शकतात.
* अकाळी दात तुटतात-
कदाचित हे माहीत नसेल की नियमितपणे दाताच्या बरोबर जीभ स्वच्छ केली नाही तर दात लवकर तुटून पडण्याची भीती असते. जीभ स्वच्छ न केल्याने तोंडात बॅक्टेरिया घर करतात, या मुळे वयाच्या पूर्वी दात तुटू लागतात. म्हणून दात स्वच्छ करण्यासह जीभेची स्वच्छता देखील करावी.
* हिरड्या कमकुवत होतात-
असं काही नाही की दात स्वच्छ केल्याने हिरड्या बळकट होतात. जर आपल्याला असे हवे की नेहमी हिरड्या बळकट असाव्यात, तर या साठी आपल्याला नियमित जीभ देखील स्वच्छ केली पाहिजे. जीभ नियमितपणे स्वच्छ न केल्याने त्यावरील असलेले बॅक्टेरिया हळू-हळू हिरड्यांना कमकुवत करतात, हे तेव्हा कळते जेव्हा काही त्रास उद्भवतो.
* जीभेवर छाले होणं -
बऱ्याच वेळा जीभ स्वच्छ न केल्यानं जीभेवर छाले होतात. असं होऊ नये या साठी नियमितपणे दातासह जीभेची स्वच्छता देखील करावी. जर आपण दिवसातून दोन वेळा ब्रश करता तर दोन्ही वेळा जीभेची स्वच्छता देखील करावी. या मुळे जीभेवर छाले होणार नाही.
* तोंडाला वास येणं-
बऱ्याच वेळा असं वाटते की काही खाद्यपदार्थांमुळे तोंडातून वास येत आहे. पण वारंवार जीभेची स्वच्छता न केल्यामुळे तोंडातून वास येतो. जीभेची स्वच्छता न केल्याने जीभेवर सूक्ष्मजंतू येतात, ज्यांच्या मुळे वास येतो. बऱ्याच वेळा जीभेची स्वच्छता न केल्यामुळे अन्नाची चव देखील चांगली लागत नाही. म्हणून दातासह जीभेची स्वच्छता नियमितपणे करणे देखील आवश्यक आहे.