रविवार, 5 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 22 जून 2020 (08:32 IST)

Benefit Of Drinking Water : पाणी पिण्याचे उत्तम फायदे जाणून घ्या

1 सर्वप्रथम पाणी पिण्याचा एक मोठा फायदा आपण सर्वानांच ठाऊक असणार की केवळ योग्य प्रमाणात पाणी पिण्यामुळे वजन कमी करता येतं. पण आपणास हे ठाऊक नसेल की हे केवळ 9 दिवसांमध्ये शक्य आहे. या 9 दिवसात आपण जॉगिंग केल्यावर जेवढी कॅलरी कमी होत तेवढे वजन कमी करू शकता.
 
2 याने आपले मेटॅबॉलिझम सुधारेल आणि ऊर्जेची पातळी देखील वाढेल. ज्यामुळे आपण चपळ आणि स्फूर्तिवान राहाल. विशेष करून सकाळच्या वेळी पाण्याचे भरपूर प्रमाण आपल्या मेटाबालिझ्मला सुधारंत. 
 
3 आपले मेंदू अजून चांगल्या पद्धतीने काम करतं. आपल्याला मेंदूची ऊर्जा आणि क्षमता वाढण्याचे जाणवेल. कारण मेंदूचा जवळ जवळ 75 ते 85 टक्के भाग पाण्यामध्ये असतो. म्हणून आपण जास्तीत जास्त पाणी पिऊन त्याला बळ देता. आणि आपली एकाग्रता वाढवता. 
 
4 जर आपण कमी प्रमाणात आहार घेत असाल अर्थात ओव्हर इटिंग टाळत असाल आणि किंवा योग्य प्रमाणात पाणी पित असल्याने आपल्याला पोट भरल्यासारखे वाटत असेल तरी आपण वजन कमी करण्यात यशस्वी ठरु शकता. 
 
5 जेव्हा आपल्या शरीरामध्ये पाण्याची पातळी चांगली असते, तरळतेमुळे आपले शरीर विषारी घटकांना सहजपणे बाहेर काढतं आणि आपल्या वय आणि आरोग्यावर त्याचा प्रभाव दिसून येतो.
 
6 पाणी पीत राहणं, अनेक आजारांवरचा प्रभावी उपाय आहे. विशेष करून उच्चरक्तदाब, मूत्रपिंडाचे त्रास, मूत्राशयाचे आजार, आणि आंतड्यांचा कर्करोग, इत्यादी होण्याची शक्यता नसते.
 
7 आपल्या शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण चांगल्या आणि योग्य पातळीवर असल्यास आपले हृदय चांगल्या प्रकारे काम करत. दिवसभरातून किमान 5 ग्लास पाणी पिणं हृदयविकाराच्या धोक्याला 41 टक्क्यांनी कमी करतं.
 
8 पाणी पिण्याची ही सवय आपल्या त्वचेच्या सौंदर्यात वाढ करते. आपली त्वचा मऊ, स्वच्छ, डाग नसलेली, आणि तेलमुक्त बनते.
 
9 आणि हो, आपले पैसे वाचतील. कारण आपण ज्या आवडीच्या पेय पदार्थांवर पैसे उधळता, त्या ऐवजी आपल्याला सहजरित्या आणि स्वस्तामध्ये मूल्य न आकारता आपण शुद्ध पाणी पिऊ शकता.