रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 18 जून 2020 (06:39 IST)

Corona Virus : घरातून बाहेर पडताना या गोष्टी लक्षात ठेवा

कोरोना व्हायरसशी लढा देताना फक्त खबरदारी घेण्याची गरज आहे. आपण जागरूक असाल आणि सावधगिरीने पाउले टाकत असाल तर आपण स्वतःला या संकटाच्या काळात सुरक्षित ठेवू शकता. आपण या लेखामधून हे जाणणार आहात की घरातून बाहेर पडताना आपल्याला कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे...
 
* घरातून बाहेर पडताना लक्षात ठेवा की सार्वजनिक स्थळी आपल्याला मास्क लावायचा आहे. जेणे करून आपण या व्हायरसापासून स्वतःला वाचवू शकता. त्याच बरोबर हे लक्षात ठेवा की आपण एकटे असताना मास्क वापरू नये. मास्क आपल्याला फक्त वर्दळ असलेल्या जागीच वापरायचे आहे.
 
* लिफ्टचा वापर करताना दार उघडण्यासाठी आपल्या बोटांना स्पर्श करणे टाळा. या ऐवजी आपण किल्ली किंवा हाताचा कोपरा वापरू शकता. आपण आपल्याबरोबर टिशू ठेवा.
 
* शिकताना किंवा खोकताना आपल्या तोंडाला एखाद्या टिशूने झाका आणि नंतर टिशू त्वरित डस्टबिनमध्ये टाका.
 
* आपल्या हाताला स्वच्छ करीत राहा. यासाठी आपण सॅनिटायझरचा वापर करावं. लक्षात ठेवा की आपल्याबरोबर सॅनिटायझर बाळगायचे आहे.
 
* सामाजिक अंतराच्या नियमांकडे दुर्लक्ष करू नका. लोकांपासून योग्य अंतर राखा. हे देखील लक्षात ठेवा की कोरोनाचा धोका अद्याप टळला नाही.
 
* चेहऱ्यावर वारंवार हात लावणे टाळावे. बहुतेक लोकांना आपल्या चेहऱ्याला वारंवार हात लावण्याची सवय असते. या सवयीला बदलणे आपल्या आरोग्यासाठीच चांगले आहे.