ऑलिव्ह तेल घेताय?
ऑलिव्ह ऑईलच्या गुणधर्मांबाबत आपण बरेच काही ऐकतो. या तेलात फॅट्सचे प्रमाण तुलनेने बरेच कमी असते. त्यामुळे मधुमेही, हृदयासंबंधी तक्रारी असणार्यांना ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अधिक आरोग्यदायी असते.
या तेलावर कमीत कमी प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या ऑलिव्ह ऑईलमधले पोषक घटक टिकून राहातात.
साध्या ऑलिव्ह ऑईलवर बरीच प्रक्रिया झालेली असते. या दरम्यान तेलातील पोषक घटक निघून जातात आणि त्याचा शरीराला काहीच लाभ होत नाही.
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह आईलमध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाण बरेच जास्त असते. तसेच यात लाभदायी फॅट्सही असतात. यातल्या फेनॉलिक नामक घटकामुळे मधुमेहाला प्रतिबंध करणे शक्य होते. तसेच मेंदूचे आरोग्यही सुधारते.