मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 18 नोव्हेंबर 2019 (12:37 IST)

हसण्याचे पाच फायदे

केवळ आपल्या जराश्या हासूमुळे फोटो चांगलं येऊ शकतो तर खळखळून हसल्याने जीवनातील फोटो किती सुंदर होऊ शकतो याची कल्पना करा. 
 
हसण्यामुळे हृद्याचा व्यायाम होता. रक्त संचार सुरळीत होतं. हसल्यामुळे शरीरातून एंडोर्फिन रसायन निघतं, हे द्रव हृद्याला मजबूत करतं. हसल्यामुळे हार्ट अटॅकची शक्यता देखील कमी होते.
 
एका शोधाप्रमाणे ऑ‍क्सीजनच्या उपस्थितीत कर्करोग सेल आणि अनेक प्रकाराचे हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरस नष्ट होतात. हसण्यामुळे ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळते आणि शरीराचे रोगप्रतिकारक यंत्रणा देखील मजबूत होतं.
 
सकाळी हास्य योग केल्याने दिवसभर प्रसन्न वाटतं. रात्री हास्य योग केल्याने झोप चांगली येते. हास्य योगामुळे आमच्या शरीरात अनेक प्रकाराच्या हार्मोन्सचा स्त्राव होतो ज्यामुळे मधुमेह, पाठदुखी आणि ताण सारख्या आजारामुळे त्रस्त लोकांना फायदा होतो.
 
हसल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. आनंदी वातावरणामुळे दिवसभर खूश वाटतं. ताण जाणवत असेल तर एक-दोन जोक्स आपलं मूड बदलू शकतात.
 
दररोज एका तासा हसल्याने 400 कॅलरीज कमी होतात ज्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण राहतं.