शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 एप्रिल 2022 (08:47 IST)

Rock Salt उपवासात आपण सैंधव मीठ का खातात आणि त्याचे शरीराला काय फायदे, जाणून घ्या

Rock Salt बहुतेक लोक उपवासात सैंधव मिठाचे सेवन करतात कारण लोक या मीठाला शुद्ध मानतात, अशा परिस्थितीत लोक उपवासात फळांचे सेवन करण्याबरोबरच अन्नामध्ये सैंधव मिठाचा वापर करतात.उपवासात ते का वापरले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत.
 
यामुळे सैंधव  मीठ वापरतात - सैंधव मीठ हे मीठाचे सर्वात शुद्ध रूप मानले जाते. त्याचबरोबर ते बनवताना रासायनिक प्रक्रियेतून जावे लागत नाही. दुसरीकडे जर आपण सामान्य मीठाबद्दल बोललो, तर सामान्य मीठाला अनेक रासायनिक प्रक्रियांमधून जावे लागते, ज्यामुळे कॅल्शियम, पोटॅशियम इत्यादी आवश्यक पोषक घटक कमी होतात. याच कारणामुळे उपवासाच्या वेळी सैंधव मिठाचे सेवन केले जाते, ज्यामुळे शरीराला अधिक पोषक तत्वे मिळतात.
 
सैंधव मीठ खाण्याचे फायदे
रक्‍तदाब नियंत्रित ठेवण्‍यासाठी सैंधव मिठाचाही तुम्‍हाला खूप उपयोग होऊ शकतो. सैंधव मिठात कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. अशा परिस्थितीत जे लोक लवकर थकतात ते रॉक सॉल्टचे सेवन करून रक्तदाबाची समस्या कमी करू शकतात.
सैंधव मीठ डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. सैंधव मीठ दृष्टी कमी होणे टाळू शकते.
पचनसंस्थेला निरोगी बनवण्यासाठी सैंधव मिठाचा खूप उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला उलट्या किंवा मळमळ यासारख्या समस्या होत असतील तर लिंबाचा रस सैंधव मिठामध्ये मिसळा आणि मिश्रणाचे सेवन करा.