सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified शनिवार, 6 जून 2020 (18:19 IST)

कोलेस्टेरॉल वाढतातच शरीर देतं संकेत, वाचा 6 महत्त्वाचं गोष्टी

आज कोलेस्टेरॉलचा धोका अशी समस्या बनले आहे की तरुण, मध्यम वयोगटाचे लोकं आणि वृद्धांना सावध राहण्याची गरज आहे. हा असा धोका आहे की आपल्याला कळणारच नाही आणि परिस्थिती हाताळणे फार कठीण जाईल. विकट परिस्थिती येण्यापूर्वीच थांबवावे.
 
कोलेस्टेरॉल वाढण्यापासून बचावासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप योजना आखायला हवी. काही लहान पावलं घेऊन आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. 
या धोक्यापासून आपल्याला कसे लांब ठेवता येईल हे आपल्याला आजच कळणार आहेत. 
 
पहिले पाऊल : शरीराला कोलेस्टेरॉलची गरज असते
महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीराला कॉलेस्ट्रालची गरज असते. कोलेस्टेरॉल हे एक केमिकल कंपाउंड आहे. जे पेशींच्या निर्माण आणि हार्मोन्ससाठी आवश्यक असतं. परंतू शरीरात याचे प्रमाण वाढल्यावर समस्या उद्भवू लागतात. हृदयाचे आजार, हृदयघात, पेरिफेरल आर्टरी डिसीजचा धोका आपल्याला वेढून घेतो.
 
दुसरे पाऊल : कोलेस्टेरॉल किती प्रकाराचे
कोलेस्टेरॉल दोन प्रकाराचे असतात. लो डेंसिटी लिपोप्रोटींस (एलडीएल) किंवा बॅड कोलेस्टेरॉल (हानिकारक कोलेस्टेरॉल) हे रक्त वाहिन्यांमध्ये जमा होतो ज्यामुळे धोकादायक आजार होऊ शकतात. हाय-डेंसिटी लिपोप्रोटींस (एचडीएल) ज्याला चांगले कोलेस्टेरॉल देखील म्हटले जाते, जे वाईट कोलेस्टेरॉलला यकृतापर्यंत घेऊन जाण्याचे कार्य करतात ज्याने ते शरीराच्या बाहेर निघण्यास मदत होते. 
 
तिसरे पाऊल : यकृत कोलेस्टेरॉल बनवतं
आपले यकृत शरीराला आवश्यक असलेले 80 टक्के कोलेस्टेरॉल बनवून घेतं. उरलेले 20 टक्के आपल्या आहारावर अवलंबून असतात. जसे मीट, अंडी, मासे, कोंबडी, दुग्धजन्य (दूध, दही,तूप) हे कोलेस्टेरॉल मिळविण्याचे स्रोत आहे. झाडांपासून मिळणाऱ्या अन्नात कोणत्याही प्रकाराचे कोलेस्टेरॉल नसतं. रक्तामधील कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम यकृत करतं. दर वेळी जेवणानंतर लहान आतड्या कोलेस्टेरॉलला ग्राह्य करून घेतात. ज्याचा साठा यकृत करून घेतो आणि ज्यावेळी शरीराला कॉलेस्ट्रालची गरज असते त्यानुसार यकृत त्याला उपयोगासाठी काढतं. ज्यावेळी शरीरात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल साठत जातं तेव्हा ते रक्त वाहून नेणाऱ्या नळ्यांजवळ गोठू लागतं. ज्यामुळे ह्या लहान होऊ लागतात. 
 
चवथे पाऊल : हे धोकादायक कधी होतं
असे अन्न खाल्ल्यास ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात कोलेस्टेरॉल असतं, शरीरामध्ये एलडीएल (बॅड कोलेस्टेरॉल)वाढू लागतं. ज्याला हाय कोलेस्टेरॉल म्हणतात. जर शरीरात एलडीएल जास्त असेल आणि एचडीएल खूप कमी असेल तर रक्त वाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साठू लागतं. शरीरामध्ये रक्त विसरणं व्यवस्थितरीत्या होत नाही. जेणे करून हृदय आणि मेंदूच्या समस्या उद्भवतात. हे जीवानिशी होऊ शकतं.
 
पाचवे पाऊल : कोलेस्टेरॉल वाढण्याची चिन्हे 
हाय कोलेस्टेरॉलचे स्वताचे काहीही लक्षण नसतात. बहुतेक प्रकरणामध्ये हा आजार एकाएकी समोर येतो. हे आपल्या समोर हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकच्या स्वरूपात येतं. आपल्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढतंच जातं. रक्तवाहिन्या लहान होतात आणि रक्त विसरणं योग्यरीत्या होत नसतं.
 
सहावे पाऊल : कसे राहावं सावध 
रक्ताची तपासणी केल्यावर कोलेस्टेरॉल असल्याचे आढळू शकतं. आपल्याला सुचवलं जातं की वयोगट 20 वर्षांनंतर दर 4 ते 6 वर्षांनी रक्ताची तपासणी करवून घेणे. आपल्या कुटुंबात कोणाला हाय कोलेस्टेरॉलचा इतिहास असल्यास आपण लवकरात लवकर कॉलेस्ट्रालची तपासणी करावी. उच्च रक्तदाब, वजन वाढणे आणि धूम्रपान करणाऱ्यांचा बाबतीत कॉलेस्ट्रालची तपासणी करणं कधीही चांगलंच.