शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 3 एप्रिल 2022 (16:08 IST)

या उन्हाळ्यात काकडी चे सेवन केल्याने आरोग्यदायी फायदे मिळतील

उन्हाळा सुरू झाला आहे. काकडीही बाजारात येऊ लागली आहे. आजारांपासून दूर राहायचे असेल तर.या उन्हाळ्यात भरपूर काकडी खा. कारण हे खाण्याचे एक नाही तर अनेक मोठे फायदे आहेत. हाडे मजबूत करण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यात काकडीची विशेष भूमिका असते. याशिवाय काकडी खाण्याचे काय फायदे आहेत. ते जाणून घेऊ या. 
 
1 हाडे मजबूत करण्यासाठी -बदलत्या जीवनशैलीत हाडे दुखण्याची तक्रार सामान्य झाली आहे. हाडे दुखण्याची तक्रार असल्यास उन्हाळ्यात भरपूर काकडी खा. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
 
2 त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर- याशिवाय त्वचा आणि केसांसाठीही काकडी अतिशय खास आणि उपयुक्त आहे. काकडी खाल्ल्याने केसांची वाढ चांगली होते आणि त्वचा चमकदार होते.
 
3 बद्धकोष्ठता मध्ये देखील उपयुक्त-बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही काकडी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास यावेळी आपल्या आहारात काकडीचा समावेश जरूर करा.
 
4 रक्तदाब नियंत्रणात राहील- ब्लड प्रेशर संतुलित ठेवण्यासोबतच कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यातही काकडी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे काकडीचा आहारात समावेश करण्याचा प्रयत्न करा.
 
5 वजन कमी करण्यासाठी काकडी गुणकारी आहे- वजन कमी करण्यासोबतच किडनीच्या समस्यांवरही काकडी उपयुक्त आहे. वजन कमी करायचे असल्यास   आहारात काकडीचा समावेश जरूर करा.काकडीत पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. पोटॅशियमसह, ते शरीरातून यूरिक ऍसिड आणि किडनीतील अशुद्धता बाहेर काढून टाकते.
 
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. हे अवलम्बवण्यापूर्वी वैद्यकीय परामर्श घ्यावा. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.)