बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 2 डिसेंबर 2021 (12:10 IST)

आयरन परिपूर्ण पालक सूप प्या, हीमोग्लोबिन वाढवा

आजकाल बाजारात पालक भरपूर प्रमाणात मिळत आहे. चवीत थोडा कडूपणा असला तरी आरोग्यासाठी तितकाच फायदेशीर आहे. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. जर तुमचे हिमोग्लोबिन खूप कमी असेल तर तज्ञ पालक खाण्याचा सल्ला देखील देतात. अशा प्रकारे तुम्ही पालक सूप बनवू शकता. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
 
पालक सूप साठी साहित्य
पालक, मीठ, आले, कोथिंबीर, टोमॅटो, लिंबाचा रस, काळी मिरी, मलई.
 
कसे बनवावे
पालक सूप बनवण्यासाठी प्रथम पालक स्वच्छ करा. साफ केल्यानंतर कापून घ्या. आता एका भांड्यात पाणी गरम करून त्यात पालक, टोमॅटो आणि आले उकळा. उकळल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्याची चांगली पेस्ट बनवा. आता दुसऱ्या भांड्यात दोन कप पाणी गरम करून त्यात तयार पेस्ट टाका आणि थोडा वेळ शिजवा. नंतर त्यासोबत इतर साहित्य टाकून एक ते दोन मिनिटे शिजवून गॅस बंद करा. आता वर मलई टाकून सर्व्ह करा.
 
पालकाचे इतर फायदे
शरीराला सर्व पोषक तत्वांची गरज असते. अशा परिस्थितीत पालक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अँटीऑक्सिडंट्स आणि कॅन्सरविरोधी घटकांनी समृद्ध असलेली ही हिरवी भाजी आरोग्यासाठी उत्तम मानली जाते. पालक ही लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेली पालेभाजी आहे, जी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पालक खाण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे त्यात कॅलरी आणि चरबी कमी असते. पालक तुमच्या शरीरात आवश्यक पोषक आणि फायबर भरते. पालकामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या टाळण्यास मदत करते. पालकामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होते. पालक खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल.