1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (20:54 IST)

सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे निलगिरीचे तेल

Eucalyptus oil is useful for relieving colds and headaches Useful Eucalyptus oil for for relieving colds and headaches  Benefites of Eucalyptus oil is useful for relieving colds and headaches Health tips for Eucalyptus oil is useful for relieving colds and headaches  सर्दी पडसं आणि डोकेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असे निलगिरीचे तेल आरोग्यवर्धक निलगिरी तेल neelgiri tel nilgiri telache fayde in Marathi  Information about Eucalyptus oil is useful for relieving colds and headaches In MArathi Webdunia Marathi
हिवाळ्यात अनेक समस्या वाढतात. काहींना थंडीमुळे डोकेदुखी तर काहींना सर्दी आणि पडसं चा त्रास उदभवतो. त्याचबरोबर वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमाच्या रुग्णांच्या समस्याही वाढू लागतात. अशात आपण निलगिरी तेल चा वापर करू  शकता. हे सर्दी पडसं आणि डोके दुखी कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. चला तर मग निलगिरी तेलाचे फायदे जाणून घेऊ या. 
 
1 संसर्गाशी लढा- अनेक अभ्यासानुसार निलगिरी तेल आणि त्याचे मुख्य घटक, जीवाणू, विषाणू , बुरशी आणि आजारी बनवणाऱ्या सूक्ष्मजीवांशी लढा देतात. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा विचार केला जातो. तेव्हा निलगिरी तेलाचा वापर केला जातो.हे कॅन्डिडा आणि पायाच्या नखांच्या बुरशीविरूद्ध अँटी-फंगल एजंट म्हणून देखील वापरले जाते.
 
2 वेदना आणि सूज - या तेलामध्ये वेदना कमी करण्याची आणि सूज कमी करण्याची शक्ती आहे. हे स्नायू दुखणे, वेदना, सूज , घसा खवखवणे आणि बरेच काही कमी करते. काही अभ्यासानुसार, ज्या श्वासाची समस्या असलेल्या रुग्णांनी नीलगिरी तेलाचा वापर केला त्यांना देखील मोकळा श्वास घेता आला आणि त्यांच्या  वेदना कमी झाल्या.
 
3 डोकेदुखी - निलगिरी तेल हे डोकेदुखीसाठी सर्वोत्तम तेलांपैकी एक आहे. हे सायनसचा त्रास कमी करण्यास मदत करते. हे मानसिक क्लेरिटी वाढवते आणि तणावग्रस्त चेहऱ्याच्या स्नायूंना आराम देते. तणावामुळे किंवा थकव्यामुळे होणाऱ्या डोकेदुखीशी लढण्यास मदत करते.
 
4 जखमेची काळजी- या तेलामध्ये अँटिमायक्रोबियल आणि अँटिसेप्टिक गुणधर्म आहेत. त्वचेच्या जळजळांसाठी देखील निलगिरी तेल एक उत्तम तेल आहे. हे फोड, चिरणे, व्रण, जखमा,  खरूज, पुळ्या ,पुटकुळ्या, ऍथलीट फूट आणि बॅक्टेरिया डर्माटायटीस विरुद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.