शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (08:40 IST)

मास्क कसे धुवावे, या सोप्या टिप्सचे अनुसरणं करा

कोरोनाचा उद्रेग वाढतच आहे या संसर्गाला सामोरी जाण्यासाठी सामाजिक अंतर राखणे फेसमास्क आणि स्वच्छता राखण्याचा सल्ला दिला जात आहे. आपण बाहेर जाताना वर्दळीच्या ठिकाणी आपला चेहरा झाकणे विसरू नका.कारण स्वतःला सुरक्षित ठेवण्याचा हा सोपा मार्ग आहे.तसेच स्वच्छतेची काळजी घेण्याची देखील गरज आहे.
आपण कापडी मास्कचा वापर करत असाल तर वेळोवेळी ते धुणे देखील आवश्यक आहे.लोकांना कापडी मास्क लावण्याचा सल्ला दिला जात आहे. कारण आपण हे धुऊन पुन्हा वापरण्यात घेऊ शकता.हे कापडी मास्क कसे धुवायचे हे जाणून घेऊ या. 
 
 कापडी मास्क दररोज धुणे आवश्यक आहे अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने देखील हाच सल्ला दिला आहे. सीडीसीच्यानुसार मास्क दररोज धुणे आवश्यक आहे.आपण बाहेरून परत येताना मास्क न धुता ठेवू नका. हे स्वच्छ धुऊन वाळवून नंतर वापरण्यात आणायचे आहे.
या साठी  1 बादली गरम पाण्यात डिटर्जंट घाला. हे मास्क 15
 मिनिटे त्या पाण्यात भिजत ठेवा. नंतर हाताने चोळून परत सौम्य गरम पाण्यात घालून पिळून घ्या आणि वाळवा.
 
मास्क वॉशिंग मशीन मध्ये धुवत आहात तर गरम सेटिंगवर ठेवा. जेणे करून सर्व जंतू मरतील.नंतर या मध्ये डिटर्जंट घाला. 
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने (सीडीसी)ने मास्क धुण्यासाठी ब्लीचचा घोळ तयार करण्यास सांगितले आहेत. हे कसे तयार करता येईल चला तर मग जाणून घेऊ या.   
 
*4 कप पाण्यात एक लहान चमचा ब्लीच घाला. 
* ब्लीच तपासून बघा की हे संक्रमण काढून टाकण्यासाठी आहे किंवा नाही.
* आपल्या त्वचेला या मुळे काही इजा होणार नाही याची खबरदारी घ्या.
* ब्लीचची अंतिम मुदत तपासून बघा.
* घरगुती ब्लीच कधीही अमोनिया किंवा इतर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या क्लीनर मध्ये मिसळू नका. 
* ब्लीचच्या घोळात फेसमास्क 5 मिनिटा साठी घालून ठेवा. 
* पाण्याने चांगल्या प्रकारे धुऊन घ्या. 
* धुतल्यावर वाळत ठेवा नंतर वापरा.