शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:07 IST)

मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

Nethili fish
मासे खाल्ल्यानंतर किंवा मासे सह हे 7 पदार्थ खाल्ल्याने गंभीर आजार होऊ शकतात.
 
दही: मासे खाल्ल्यानंतर दही खाऊ नका, कारण दहीमध्ये असलेल्या प्रोटीन्सचे मिश्रण विष बनू शकते.
 
ताक : मासे खाल्ल्यावर ताक पिऊ शकत नाही, कारण त्यामुळे त्वचेचे आजार होण्याची शक्यता वाढते.
 
कॉफी किंवा चहा : चहा-कॉफीमध्ये असलेले कॅफिन माशांसोबत मिसळून विषारी बनतं, जे शरीरासाठी घातक असते.
 
दूध : दुधात आढळणारे पोषक घटकांसह माशांमध्ये आढळणारे पोषक घटक मिळून शरीरावर विपरीत परिणाम करतात.
 
आईस्क्रीम: गरम प्रकृती असलेल्या माशांसह थंड प्रकृती असलेली आइस्क्रीम खाल्ल्यास त्वचेच्या किंवा पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 
दुधाची मिठाई : मासे खाल्ल्यानंतर दुधापासून बनवलेली मिठाई खाऊ नये.
 
चिकन : मासे आणि चिकनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने असतात. या प्रथिनांचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.
 
टीप: आरोग्याशी संबंधित घटक माहितीसाठी आहेत, अमलात आणण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.