शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (13:03 IST)

उन्हाळ्यात काय खावे

Summer - Diets
या पदार्थांनी पोट थंड ठेवा
केळी- पोटात गरम होत असेल तर केळी खावी. केळ्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अॅसिड नियंत्रणात राहते. केळीमध्ये आढळणारे pH तत्व पोटातील ऍसिड कमी करते. त्यामुळे पोटात गुळगुळीत थर तयार होतो आणि उष्णतेपासून आराम मिळतो. केळ्यामध्ये फायबर देखील भरपूर असते, त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते.
 
पुदिना- पुदिन्याची पाने खाल्ल्याने पोटातील ऍसिडही कमी होते. 1 ग्लास पाण्यात पुदिन्याची काही पाने उकळा. आता ते थंड झाल्यावर प्या.
 
बडीशेप- पोटाची उष्णता शांत करण्यासाठी बडीशेप आणि साखर खाल्ल्यानंतर खा. यामुळे पोटातील जळजळ शांत होईल. ऍसिडिटीची समस्याही बडीशेप खाल्ल्याने दूर होते. तुम्ही बडीशेप पाण्यात उकळूनही पिऊ शकता.
 
थंड दूध- पोटाच्या तापासाठी रोज नाश्त्यात 1 कप थंड दूध प्या. दुधामध्ये कॅल्शियम असते जे तुमच्या पोटातील उष्णता शोषून घेते आणि थंडपणा आणते.
 
तुळशीची पाने- रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने पोटातील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे पोटातील आम्लही कमी होते. तुळशीच्या पानांसह मसालेदार अन्न सहज पचते. रोज सकाळी पाचे ते सहा तुळशीची पाने खावीत.
 
तरबूज- यात 70 टक्के पाणी असतं. पाणीच नव्हे तर व्हिटॅमिन सी आणि ए तसेच मॅग्निशियम भरपूर प्रमाणात आढळतं. या व्यतिरिक्त कॅलरीज देखील कमी असतात. तरबजू खाल्ल्याने वजन देखील वाढत नाही आणि पोट भरलेलं राहतं.
 
एप्रीकॉट- यात बीटा-कॅराटिन आढळतं. हे त्वेचसाठी योग्य ठरतं.
 
काकडी- उन्हाळ्यात काकडी खाणे खूप फायदेशीर ठरतं. याचे सेवन केल्याने पाण्याची कमतरता भासत नाही. यात व्हिटॅमिन के, पो‍टेशियम, मॅग्निशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतं ज्याने कब्ज संबंधी समस्या सुटते. काकडी खाल्ल्याने खूप वेळ पाण्याची तहान देखील भासत नाही.
 
दही- दह्यात व्हिटॅमिन, कॅल्शियम, फास्फोरस, पोटेशियम आणि मिनरल्यस भरपूर प्रमाणात आढळतात. हे हाडांसाठी चांगलं आहे. तसेच आपण 250 ग्रॅम दही खात असाल तर त्यात 75 टक्के प्रमाण पाण्याचं असतं ज्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं.
 
नारळपाणी आणि ताक- उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक आणि नारळ पाणी याचे सेवन रकावे. ताकात लॅक्टिक अॅसिड असतं ज्याने पचन संबंधी समस्या उद्भवत नाही. तसेच नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमी भासत नाही. यात कॅल्शियम, क्लोराइड आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळतं.