शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 15 मार्च 2022 (18:39 IST)

तुळशीचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

तुळशीची पाने आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि दररोज त्याचे सेवन केले पाहिजे हे तर सर्वांनी ऐकलंच असेल. हे केवळ सर्दी आणि खोकला दूर ठेवत नाही तर आपले रोग प्रतिकारशक्ती बळकट करून आपल्याला बर्‍याच रोगांपासून संरक्षण करते. याचा वापर शतकानुशतके आयुर्वेदात वापरला जात आहे. जरी अनेक कारणांमुळे तुळशीला धार्मिक कारणास्तव स्थान देण्यात आले आहे, परंतु आरोग्य राखण्यासाठी देखील तुळस खूप उपयुक्त आहे. परंतु फारच थोड्या लोकांना माहिती आहे की जर त्याचे पाणी उकळल्यानंतर त्याचे सेवन केले तर त्याची गुणवत्ता अनेक पटींनी वाढते. जर आपणास सकाळी गरम पाणी किंवा चहा पिणे आवडत असेल किंवा लिंबूपाण्याचे सेवन करत असाल तर हे जाणून घेतल्यावर तुळशीच्या पानांचे पाणी सेवन करायरा सुरुवात कराल याने आरोग्यास बराच फायदा होईल. चला तर मग आपण जाणून घ्या की तुळशीच्या पाण्याचे फायदे काय आहेत आणि त्याचा वापर कसा करावा .
 
तुळशीच्या पानांचं पाणी अशा प्रकारे तयार करा-
सर्वप्रथम एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घाला आणि उकळवा. आता त्यात तुळशीची पाने घाला आणि पाणी अर्धे होईपर्यंत हे पाणी उकळू द्या. गॅस बंद करा आणि गाळून घ्या. आता त्यात मध घालून सेवन करा.
 
तुळशीचे पाणी पिण्याचे फायदे -
1. साखरची पातळी नियंत्रित करते
तुळसचे हे पाणी पिल्याने चयापचय सुधारतो, ज्यामुळे कार्ब आणि चरबी जाळणे सोपे होते. यामुळे, आपल्या रक्तात साखरेची पातळी नियंत्रणात राहते. या सर्व गुणधर्मांमुळे मधुमेह रोगी रक्तातील साखरेची पातळी अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित ठेवू शकतात.
 
2. तणाव दूर करते- 
आजच्या जीवनशैलीमध्ये प्रत्येकजण ताणतणावाशी झगडत आहे. हा ताण नंतर अनेक गंभीर आजारांचे कारण बनतो. अशा परिस्थितीत आपण तुळशीच्या पानांचे गरम पाण्यात उकळवून सेवन केले तर आपल्याला तणावातून आराम मिळतो. तुळसमध्ये उपस्थित घटक हार्मोन कोर्टिसोलला संतुलित करतात जे तणावाचे मुख्य कारण आहे.
 
3. वजन कमी करण्यास मदत करते -
आज प्रत्येकजण वाढणार्‍या वजनामुळे त्रासलेला आहे. वाढत्या वजनामुळे, व्यक्ती केवळ रोगांना पकडत नाही तर ती व्यक्ती ताणतणावातही राहू लागते. तुळशीच्या पानांचा वापर केल्यास आपल्याला या समस्येपासून आराम मिळतो.
 
4. पचन क्रिया सुधारते- 
तुळशीच्या पानांमध्ये पाचक घटक असल्यामुळे पचन सुधारतं आणि अपचन, वायू इत्यादी काढून टाकण्यास मदत होते. त्याच्या सेवनाने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात.
 
5.श्वसन रोगांपासून बचाव करते -
तुळशीच्या पानांमध्ये इम्युनोमोडायलेटरी आणि कफ पाडणारे गुणधर्म असतात जे आपल्या श्वसन प्रणालीची काळजी घेतात आणि श्वसन समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.