आल्याचं सेवन कशा प्रकारे करावे?
आल्याचं सेवन केल्याने सर्दी खोकला आणि थंडीपासून बचाव होतो. जाणून घ्या सेवन करण्याची पद्धत-
1. चहासोबत - आल्याला किसून चहामध्ये उकळून प्या.
2. पाण्यासोबत - एक ग्लास पाण्यात आल्याचे काही तुकडे टाकून पाणी उकळून घ्या आणि कोमट झाल्यावर याचे सेवन करा.
3. भाज्यांसोबत - आलं किसून भाज्यांमध्ये घालून शिजवून खाता येतं.
4. मधासोबत - आलं ठेचून त्यातून एक चमचा रस काढून अर्धा चमचा मधासोबत मिसळून प्यावे.
5. चटणीसोबत - आलं पिसून त्याची पेस्ट तयार करा आणि चटणीत मिसळून याचे सेवन करु शकता.
6. कोशिंबिरीसोबत - किसलेलं आलं कोशिंबीरमध्ये मिसळून खाऊ शकता.
7. गुळासोबत - आल्याचे काही तुकडे गुळात मिसळून देखील सेवन करु शकता.
Disclaimer- घरगुती उपाय माहितीसाठी आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन अमलात आणा.