रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : शनिवार, 20 मे 2023 (19:44 IST)

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात या गोष्टींचा समावेश करा

dinner
अनेक लोक वाढत्या वजनामुळे काळजीत असतात, अशात डायटिंग, व्यायाम, प्रोटीन शके आणि अनेक उपाय अमलात आणले जातात परंतू एक विशेष काळजी घ्यायची असते ती म्हणजे रात्रीचं जेवण. कारण ते लंचपेक्षा अधिक प्रभावी असतं. कारण रात्री अधिक कॅलरीयुक्त आहार घेतला ते चरबीच्या रुपात शरीरात जमा होतो आणि याने वजन वाढतं. रात्रीच्या जेवणासाठी खास टिपा-
 
आहार घेताना वेळ पाळली पाहिजे अर्थात लंच आणि डिनर यात सात तासाचा अंतर असला पाहिजे सोबतच दरम्यान भुकेसारख जाणवलं तर हलकं-फुलकं खावं.
डिनरसाठी पोषक आहार निवडला पाहिजे.
कोशिंबीरने डिनर सुरु करावं ज्यात कॅलरी कमी असते.
फायबरयुक्त भाज्या आणि सलाद घेतलं पाहिजे.
फायबरमुळे पोट बर्‍याच काळापर्यंत भरलेलं असतं आणि यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
रात्रीच्या जेवण्यात गव्हाची पोळी टाळल्यास योग्य ठरेल. आपण भाकरीचा समावेश करु शकता. याने पचन योग्य होतं.
रात्री जेऊन लगेच झोपणे योग्य नाही तसंच टीव्ही आणि मोबाईल बघत उशिरा पर्यंत जागे राहणे देखील टाळावे.
उशिरा पर्यंत झोपत नसल्यामुळे पुन्हा भूक लागते आणि अशात वजन वाढविण्याचे पदार्थ खाण्यात येतात. 
ओटीपोटीची चरबी कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी ग्रीन टी, कॅमोमाइल टी, दालचिनी टी इत्यादींचा समावेश करता येईल कारण यात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पाचन तंत्र निरोगी ठेवतात.