मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 31 डिसेंबर 2020 (13:27 IST)

रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारे आरोग्यवर्धक रताळे, 5 फायदे जाणून घ्या

हिवाळ्याचा हंगाम आरोग्याच्या दृष्टीने जोखिमेचा आहे. मग सर्दी पडसं किंवा व्हायरल सारख्या समस्या असो, मधुमेह असो, हृदय किंवा कर्करोगासारखे गंभीर आजार असो. या सर्व आजारांना लढा देण्यासाठी आपल्याला सज्ज करतात रताळे. 
 
निसर्गाने आपल्याला काही भेटवस्तू दिलेल्या आहे, जे आरोग्याच्या अनेक जोखमीपासून संरक्षण करण्यास मदत करतात. अशीच एक निसर्गाची देणगी आहे रताळे किंवा गोड बटाटा. जे आपण हिवाळ्यात भरपूर वापरतो. हे एक सुपरफूड आहे जे शरीराला उष्ण ठेवण्यासह आरोग्याविषयी अनेक गंभीर समस्यांपासून मुक्त होण्यात देखील मदत करत. हिवाळ्याचा हंगाम आहे आणि स्वतःला निरोगी ठेवायला सगळे इच्छुक आहे, तर या साठी रताळ्याचे सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे.
 
पोषक घटकांनी समृद्ध आहे रताळे-
रताळ्यांमध्ये ते सर्व पोषक घटक असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.या मध्ये प्रथिने, फायबर, आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, पोटॅशियम, सेलेनियम, व्हिटॅमिन -ए,बी,सी,के,बीटा-केरोटीन मुबलक प्रमाणात आढळतात.
 
या शिवाय या मध्ये अँटी-ऑक्सीडेन्ट असतात, जे फ्री रॅडिकल्स शी लढायला शरीराची मदत करतात. रताळे केवळ शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला वाढवतच नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक गंभीर समस्यांच्या जोखीम कमी करण्यास मदत करतात.
 
रताळे खाण्याचे 5 आरोग्यवर्धक फायदे जाणून घ्या-
1 मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
हिवाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांचा धोका वाढतो,परंतु रताळ्याच्या सेवनाने मधुमेहाच्या धोका कमी होण्यास मदत मिळते. एका अभ्यासात संशोधकांना असे आढळले आहे की पांढऱ्या सालीच्या रताळ्यांमुळे मधुमेह टाईप 2 असणाऱ्या लोकांमध्ये इन्स्युलिन ची संवेदनशीलता सुधारली आहे.
 
अभ्यासातून दिसले आहे की 8 आठवड्यापर्यंत उंदरांवर केलेल्या प्रयोगामध्ये सिद्ध झाले आहे की रताळ्याच्या सेवन केल्यामुळे उंदरांमध्ये इन्स्युलिनच्या प्रतिकारक पातळीमध्ये सुधारणा झाली आहे. या शिवाय या मध्ये असलेले फायबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. अभ्यासातून आढळले आहे की जे लोक फायबरच सेवन जास्त करतात त्यांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी असतो. 
 
2 कर्करोगाच्या धोका कमी होतो -
रताळे बीटा कॅरोटीन चे उत्कृष्ट स्रोत आहे. हे एक प्लांट पिगमेन्ट आहे जे शरीरात अँटी ऑक्सीडेन्टच्या रूपात काम करतो. बीटा-कॅरोटीन देखील एक प्रोव्हिटॅमिन आहे. जे नंतर शरीरात व्हिटॅमिन ए च्या रूपात बदलतो. अँटी ऑक्सीडेन्ट प्रोस्टेट आणि फुफ्फुसाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाच्या धोक्याला कमी करण्यात मदत करतो. या मध्ये केरोटीनॉयड नावाचे संयुगे जास्त प्रमाणात असतात. एका अभ्यासानुसार केरोटीनॉयड फक्शन हे एका अँटी ऑक्सीडेन्ट च्या रूपात दाखविले आहे. हे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीला नियंत्रित करण्यात मदत करतात, ह्याचा अर्थ असा आहे की हे कर्करोगाच्या धोक्याला कमी करण्यात मदत करतात.
 
3 रोग प्रतिकारक शक्ती बळकट होते -
रताळ्यात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते.हिवाळ्यात सर्दी पडसं खोकल्यासह इतर विषाणूजन्य संसर्ग होण्याचा धोका वाढतो. व्हिटॅमिन सी प्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते, शरीरातील आयरन ला शोषण्यास मदत करून रक्ताच्या कमतरते ला दूर करण्यास मदत करतो. या मुळे हिवाळ्यात होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळण्यात मदत होते.
 
4 दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर -
हिवाळ्यात श्वासाच्या तक्रारी वाढतात. ज्या मुळे दम्याच्या आजाराचा धोका वाढतो. रतळ्यांमध्ये कोलिन आहे, हे पोषक घटक स्नायूंचा वेग, शिकायला, आणि गोष्टी स्मरण ठेवण्यात मदत करतो.मज्जा संस्थेला देखील वाढवतो. एका अभ्यासातून आढळले आहे की कोलिन चे अधिक प्रमाणात सेवन केल्याने दम्याच्या रुग्णाची सूज कमी करण्यात मदत होते.
 
5 हृदयाला निरोगी ठेवण्यात फायदेशीर -
रताळे हे पोटॅशियम चा उत्कृष्ट स्रोत आहे. हृदयाची काळजी घेण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. हे रक्तदाब देखील नियंत्रित ठेवत. जेणे करून हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञाच्या मते, निरोगी हृदय ठेवण्यासाठी आहारात जास्तीत जास्त पोटॅशियम असलेले पदार्थाचे सेवन करावे.