गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (09:15 IST)

चिकूचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

चिकू हे खाण्यात गोड आणि चविष्ट फळ आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला ह्याचे फायदे जाणून घ्या 
 
1 आतड्यांना निरोगी ठेवतात - या मध्ये पॉलिफेनॉल नावाचे तत्व असतात, हे अँटिपेरासिटिक,अँटिव्हायरल,अँटी इंफ्लिमेंट्री आणि अँटी बेक्टेरिअल तत्व  पोटाचा समस्येपासून सुटका देतात. हा आतड्यांच्या विकाराचा उपचार करतात. बद्धकोष्ठता कमी करून  संसर्गापासून आराम देतात. 
 
2 रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात- या मध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आणि अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात जे रोग प्रतिकारक शक्ती ला बळकट करतात.याशिवाय हे फळ शरीराला व्हायरस, बेक्टेरिया आणि परजीवी हल्ल्यापासून शरीराचे रक्षण करतात. म्हणून चिकू नियमितपणे आपल्या आहारात समाविष्ट करावा.
 
3 त्वचा उजळतो- त्वचेला निरोगी बनविण्यासाठी आणि सुंदर  ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे. या मध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात. हे त्वचेला हायड्रेट ठेवतो.चिकू पॉलिफेनॉल्स, फ्लेवोनॉइड्स आणि अँटीऑक्सीडेंट तत्वाने समृद्ध असतात. त्वचा चे विकार दूर करण्यात प्रभावी आहे. या मुळे त्वचेच्या सुरकुत्या देखील कमी होतात. त्वचा देखील उजळते. सौंदर्य वाढवते. 
 
4 कर्करोग पासून बचाव - अँटीऑक्सीडेंट ने समृद्ध चिकू हे गुणकारी आहे. कर्करोग च्या जोखिमेला कमी करतो. व्हिटॅमिन ए आणि बी ने समृद्ध असते. फुफ्फुस आणि तोंडाच्या कर्करोगाच्या धोक्याला कमी करतो. आहारात फायबर ने समृद्ध असतो .
 
5 उच्च रक्तदाबाला नियंत्रित करतो - चिकूमध्ये एक पोटेशियम समृद्ध असतात. हे सोडियमची पातळी कमी करण्यात सहाय्यक असतो. रक्त परिसंचरण वाढवतो. रक्त दाब नियंत्रित करतो. 
 
6 वजन नियंत्रित करतो- या मध्ये असलेले फायबर घटक शरीराला विषारी घटकांपासून  मुक्त करून पचन क्रियेला सुरळीत करतात. फायबर असल्यामुळे हे खाल्ल्याने पोट भरलेले वाटते. या मुळे वजन देखील नियंत्रित राहते.