1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 23 मार्च 2023 (20:30 IST)

Olive Oil : ऑलिव्ह ऑइलचे आरोग्य फायदे जाणून घ्या

olive oil
ऑलिव्ह ऑईलच्या गुणधर्मांबाबत आपण बरेच काही ऐकतो. या तेलात फॅट्‌सचे प्रमाण तुलनेने बरेच कमी असते. त्यामुळे मधुमेही, हृदयासंबंधी तक्रारी असणार्यांना ऑलिव्ह ऑईल वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाजारात ऑलिव्ह ऑईलचे विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यापैकी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल अधिक आरोग्यदायी असते.
 
या तेलावर कमीत कमी प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे या ऑलिव्ह ऑईलमधले पोषक घटक टिकून राहातात.
 
साध्या ऑलिव्ह ऑईलवर बरीच प्रक्रिया झालेली असते. या दरम्यान तेलातील पोषक घटक निघून जातात आणि त्याचा शरीराला काहीच लाभ होत नाही.
 
एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह आईलमध्ये अँटी ऑक्सिडंट्‌सचे प्रमाण बरेच जास्त असते. तसेच यात लाभदायी फॅट्‌सही असतात. यातल्या फेनॉलिक नामक घटकामुळे मधुमेहाला प्रतिबंध करणे शक्य होते. तसेच मेंदूचे आरोग्यही सुधारते.
 
 स्मरणशक्ती वाढवा - ऑलिव्ह ऑइलमध्ये पॉलिफेनॉल तत्व असते. ज्याचे सेवन केल्याने स्मरणशक्तीशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो.
 
 हाडांच्या दुखण्यामध्ये आराम - हाडांमध्ये सतत दुखत असल्यास तुम्ही ऑलिव्ह ऑइलने देखील मसाज करू शकता. त्यात असलेले तत्व तुम्हाला आराम देईल. ऑस्टियोपोरोसिसमध्ये आराम मिळेल.
 
डोळ्यांसाठी फायदेशीर- ऑलिव्ह ऑइलने डोळ्याभोवती हलकी मालिश करणे खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर अशा प्रकारे मसाज केल्याने थकवा दूर होतो. यासोबतच झोपही चांगली लागते.