शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (16:10 IST)

देशी तूप नाकात टाका, फायदे जाणून आश्चर्य वाटेल

देशी तूप ही अशीच एक गोष्ट आहे जी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात नक्कीच उपलब्ध असते. आपण रोजच्या आहारातही ते घेतो. वय कितीही असो, दिवसभरात एक चमचा देशी तूप घेतल्याने आयुष्य अधिक चांगले राहते. आपण जेवणात देशी तूप वापरतो. पण तुम्हाला माहीत आहे का देसी तुपाचे अनेक फायदे आहेत. याचा फायदा आपण मसाज करून घेऊ शकतो आणि त्याच बरोबर नाकात तूप घातल्याने सुद्धा खूप फायदे होतात. देसी तूप नाकात घातल्याने कोणते फायदे होतात ते आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत.
 
नाकात तूप घालण्याचे कारण - नाकात तूप टाकणे चांगले कारण ते तुमच्या मेंदूसाठी टॉनिकसारखे काम करते. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की मानवी मेंदू 60% फॅट असतो आणि तुपात अत्यावश्यक फॅटी अॅसिड देखील असते. जे पोषण प्रदान करण्यात महत्त्वाचे आहेत. असे केल्याने तुम्ही मज्जासंस्थेमध्ये नवीन जीवन ऊर्जा ओतता ज्यामुळे तुमची एकाग्रता पातळी, मेंदूचे कार्य वाढण्यास मदत होते. हे तुमच्या मेंदूची शिकण्याची क्षमता देखील वाढवते. शुद्ध तूप बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि विषाणूविरोधी आहे. तुपाचा हा गुणधर्म तुमच्या मानेवरील सर्व अंतर्गत अवयवांना विषमुक्त करण्यात मदत करतो.
 
नाकात तूप किती आणि कसे टाकावे?
आपण लहान मुलाच्या नाकात एक एक थेंब देखील टाकू शकता. मुलाने नाकात तूप घालण्यास नकार दिल्यास अशा वेळी बोटात तूप घेऊन नाकपुडीलाही लावता येते. दुसरीकडे, व्यस्कर लोक प्रत्येक नाकपुडीत तुपाचे दोन थेंब टाकू शकतात. रिकाम्या पोटी नाकात तूप टाकणे चांगले. हे काम तुम्ही सकाळी नाश्त्याच्या एक तास आधी किंवा संध्याकाळी किंवा रात्री झोपतानाही करू शकता. नाकात तूप टाकण्यापूर्वी कोमट केलं तर बरे होईल. तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी देखील तुमच्या नाकात घालू शकता.