शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 10 डिसेंबर 2018 (09:06 IST)

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना आपल्या आजारावर मात करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तो पर्याय म्हणजे नियमित चालणे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमित चालण्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. रहिवासी भागाचा परिणाम माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असल्याचा निष्कर्षही कंन्सास विद्यापीठाच्या या संशोधनावरून होत असल्याचंही समोर आलं आहे. 
 
संशोधकांच्या मते, चालण्यामुळे परिसरातील भौगोलिक माहिती आणि नकाशा डोक्यात फिक्स होते. त्यामुळे व्यक्तीला आपल्याला हवे असलेले ठिकाण किती अंतरावर आहे याचा अंदाज येतो. बर्‍याचदा व्यायामाला वेळ मिळत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. मात्र व्यायामाऐवजी चालणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ आरोग्य चांगले राखण्यासाठी चालणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे. नियमित चालण्यामुळे तुमच्या अवयवांचा व्यायाम होतो. चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे ज्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे किंवा ज्यांना आपली स्मरणशक्ती आहे, तशी राखायची असल्यास आजपासूनच चालायला सुरूवात करायला हरकत नाही.