कोरोनापासून मुलांना वाचविण्यासाठी ही काळजी घ्या
कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून तिने सर्वत्र धुमाकूळ मांडला आहे. या लाटेच्या प्रादुर्भावात प्रत्येक वयोगटातील लोक याला बळी पडत आहे. या पासून मुलांना संरक्षित ठेवणे देखील आवश्यक आहे या साठी काही सावधगिरी बाळगावी लागेल जेणे करून मुलांना या संसर्गापासून दूर ठेवता येईल.चला तर मग जाणून घ्या.
* मुलांना स्वच्छता ठेवायला सांगा.त्यांना त्यांची खोली स्वच्छ ठेवण्यासाठी प्रवृत्त करा. स्वच्छता विषयी सांगा.
* मुलांना कफ,सर्दी -पडसं झाल्यावर त्वरितच औषधोपचार करा.काही ही थंड वस्तू खायला देऊ नये.चॉकलेट,आईस्क्रीम देऊ नका.
* कोविड च्या नवीन लक्षणांमध्ये पोटदुखी, उलटी, अतिसार सारखे त्रास होत आहे. असे काही लक्षणे आढळल्यास त्वरितच डॉ शी संपर्क साधावे.
* आपल्यासह मुलांना सूर्य नमस्कार करवावे. या मुळे त्यांची प्रतिकारक शक्ती वाढेल आणि ते निरोगी राहतील.
* मुलांच्या आहारात बदल करा.त्यांना पौष्टिक आणि सकस आहार खाऊ घाला. फळ खाऊ घाला.
* मुलांना वारंवार हात धुवायला सांगा तसेच तोंडाला हात लावण्यापासून रोखावे. मास्कचा वापर कसा करायचा आहे आणि कसं काढायचे आहे हे आवर्जून सांगा.
* मुलांना ऑनलाईन क्लासेस, आणि कहाणी वाचन मध्ये व्यस्त ठेवा.
* मुलांना मोकळ्या हवेत घेऊन जा. या साठी आपण त्यांना गच्चीवर नेऊ शकता.
* कुटुंब मोठे असेल तर घरातील तावदान,खिडक्या उघडून ठेवा. जेणे करून मोकळी हवा घरात येईल. बंद खोलीत व्हायरस होण्याचा धोका वाढतो.
* कुटुंबातील सदस्याने बाहेरून एखादी वस्तू आणल्यावर मुलांना हात लावू देऊ नका. वस्तूंना आधी सेनेटाईझ करा.