मंगळवार, 28 मार्च 2023
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified गुरूवार, 15 एप्रिल 2021 (09:16 IST)

Health Care: शरीराला Detox करण्यासाठी खा हे 4 पदार्थ

अनेकदा पोट स्वच्छ असल्याचे जाणवत असलं तरी पूर्णपणे स्वच्छ होत नाही. अशात शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर निघत नाही तो पर्यंत आपण आजारमुक्त असल्याचे म्हणता येत नाही. यामुळे अनेक आजार उद्भवू शकतात. अशात अशा पदार्थांचे सेवन आवश्यक आहे ज्याने आतंरीक स्वच्छता होऊ शकते. आम्ही आपल्याला अशाच 4 पदार्थांबद्दल माहिती देत आहोत-
 
1 ब्रोकली व फुलकोबी :
या दोन्ही भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळतं व फायबर शरीरातून विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतं. कोणत्याही रुपात या भाज्यांचे सेवन करणे फायद्याचे ठरेल. याने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.
 
2 नारळ पाणी :
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स व अॅटीआक्सीडेंट आढळतात ज्याने शरीरातून टॉक्सिन बाहेर पडतात व बॉडी सिस्टम स्वच्छ करण्यास मदत होते.
 
3 बीट :
चुकंदर सलाद किंवा ज्यूस या रुपात घेतल्याने शरीर स्वच्छ होण्यासही मदत होते. बीटमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आढळतं ज्याने शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास मदत होते.
 
4 लिंबू :
लिंबात आम्लीय गुण व व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात आढळतं. व्हिटॅमिन सी अॅटीऑक्सीडेंट्सचं प्रमुख स्रोत आहे. पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यावं. सलादवर लिंबचा रस टाकून सेवन करावं. याने शरीर डिटॉक्स होण्यात मदत ‍मिळते. लिंबाच्या व्यतिरिक्त आलं, सलगम व बीटरुटचा रस देखील डिटॉक्स करण्यास मदत करतं.