सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (08:30 IST)

कोरोना काळात रोग प्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी टिप्स

कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. तर कोविड नसणारे लोक आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेत आहे. प्रत्येक प्रकारचे क्रियाकलाप केले जात आहेत, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.जीवनशैलीत बदल केले जात आहेत. लॉकडाऊनमुळे एक नवीन जीवनशैली तयार केली जात आहे.आहारात देखील बदल केले जात आहे. जेणे करून निरोगी राहता येईल. जाणून घेऊ या की आपल्या रोग प्रतिकारक शक्तीला मजबूत कसे ठेवावे. 
 
* फळ -भाज्या - आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या भाज्या आणि ताज्या फळांचा समावेश करा. दररोज विविध प्रकारच्या डाळीचे सेवन आपण करू शकता. 
 
* व्यायाम -घरी राहून पौष्टीक आहार घेत असाल तर दररोज व्यायाम आवर्जून करावे. या साथीच्या रोगाच्या वेळी आपण जिम जाऊ शकतं नाही तर घरातच योगा किंवा व्यायाम करा. किमान 30 मिनिटे तरी व्यायाम करा. 
 
* पुरेशी झोप घ्या - कोरोनाच्या रुग्णांना पुरेशी झोप घेण्याची आवश्यकता आहे. दुसरीकडे, आपण कोविड नसलेले असाल तरीही खूप झोप घेणे आवश्यक आहे. हे आपले शरीर निरोगी ठेवेल. आपली रोगप्रतिकार शक्तीही मजबूत होईल.
 
* मद्यपान आणि धूम्रपान - कोरोना बाधित झाल्यावर मद्यपान आणि धूम्रपान करू नये. आपण निरोगी असाल तरीही. धूम्रपान आपल्या फुफ्फुसांना प्रभावित करतं.आणि मद्यपान केल्यावर आपल्या लिव्हर वर याचा परिणाम होतो. म्हणून कोरोनाच्या कालावधीत या दोन्ही पासून लांबच राहावे. 
 
* चांगल्या सवयी- कोरोना काळातील काही चांगल्या सवयी आहेत ज्या आपण आता दररोज करतो, जसे की हात धुणे, वारंवार तोंड किंवा नाकावर हात न लावणे, बाहेरून आल्यावर आंघोळ करणे. अशा प्रकारे आपल्या शरीरावर लागलेले जंत स्वच्छ होतील.