गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 20 डिसेंबर 2021 (12:50 IST)

धूम्रपान सोडण्याचा प्रयत्न करत आहात? या प्रकारे प्रयत्न करा, मदत होईल

काही गोष्टी आपण ट्राय करण्यासाठी करतो. जीवनात प्रत्येक गोष्ट अनुभवली पाहिजे असा विचार करुन एकदा तर करुन बघू असं ठरवतो  पण अशा वेळी काही गोष्टींची सवय कधी होऊन जाते ते कळत नाही. यापैकी एक सवय म्हणजे धूम्रपानाची सवय. असे बरेच लोक आहेत जे ट्राय करण्यासाठी पहिल्यांदा धूम्रपान करतात आणि नंतर हळूहळू अशी त्यांची सवय बनते. मग ते आरोग्यासाठी किती घातक आहे हे माहीत असूनही लोक ते सोडत नाहीत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ही सवय सोडायची असेल तर तुम्ही या पद्धतींचा अवलंब करू शकता.
 
प्रेरणा
जीवनात कोणतीही गोष्ट कठीण नसते, जरी ती अवघड वाटत असली तरी ते कामही प्रेरणेने केले जाते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला धूम्रपानाच्या सवयीपासून मुक्त करायचे असेल, तर तुम्हाला स्वत:ला शक्तिशाली बनवण्याची गरज आहे. स्वतःला प्रेरित करा. तुम्हाला असे काहीतरी निवडण्याची गरज आहे जी तुम्हाला धूम्रपानापासून दूर ठेवते. मग ते कुटुंबाशी संबंधित असो किंवा तुमच्याशी.
 
निकोटीन
जेव्हा तुम्ही ताबडतोब धूम्रपान थांबवता तेव्हा त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते, तुमच्या मनःस्थितीवर परिणाम होतो आणि तुमची ऊर्जा संपुष्टात येते. अशा परिस्थितीत, एक गोष्ट जी तुम्हाला मदत करू शकते ती म्हणजे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी. अभ्यास दर्शवतात की निकोटीन गम किंवा पॅच मदत करू शकतात.
 
आपल्या प्रियजनांशी बोला
याबद्दल तुमचे मित्र, कुटुंब किंवा तुमच्या जवळच्या लोकांशी बोला. ते तुम्हाला प्रेरित करण्यात मदत करू शकतात. तुम्ही स्पोर्ट्स ग्रुपमध्ये देखील सामील होऊ शकता जे तुम्हाला धूम्रपानाच्या सवयीपासून दूर राहण्यास मदत करते.
 
स्वतःला व्यस्त ठेवा
एकदा तुम्ही धूम्रपान सोडण्याचा निर्णय घेतला की, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवावे. तुम्ही तुमच्या मित्रांना भेटू शकता. पण धुम्रपान न करणाऱ्या मित्रांसोबत रहा. कधीकधी इतरांना पाहून तुमची प्रेरणा खंडित होऊ शकते.