1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: गुरूवार, 24 जून 2021 (17:24 IST)

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

benefits of putting oil in the navel
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा वापर वेगवेगळे फायदे मिळवण्यासाठी केला जातो. शरीराच्या सर्व अवयव नाभीशी जुळलेलं असातत. म्हणून नाभीत तेल घातल्याने सर्व समस्या सोडवता येतात. झोपताना हे तेल घालावे.
 
जर सांधेदुखी किंवा ओठ फुटल्याची समस्या असेल तर मोहरीच्या तेलाचा वापर करावा. यासाठी आपल्या नाभी मध्ये राईच्या तेलाचे काही थेंब टाकावे. 
 
सर्दी आणि कफ यांचा त्रास होत असेल तर कापसाचा गोळा अल्कोहल मध्ये बुडवून नाभीवर लावा. सर्दी- कफ वर हा उपाय अचूक ठरेल याने जुनाट सर्दी कफ सुद्धा बरं होते.
 
 मासिक पाळीमध्ये मुलींना आणि स्त्रियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या दिवसात अनेक हार्मोनल बदल होत असतात. मासिक पाळीतच्या वेळी होणाऱ्या या समस्यांपासून वाचण्यासाठी कापसाचा गोळा ब्रांडी मध्ये भिजवून नाभीवर ठेवावा. याने समस्यापासून मुक्ती मिळेल.
 
 तारुण्यात मुरुमांची समस्या अगदी सामान्य आहे. जर या समस्येमुळे त्रस्त असाल तर कडुलिंबाचं तेल नाभीत टाकावं. आजूबाजूला थोडी मसाज करावी यामुळे मुरूम आणि पुरळं येणे बंद होऊन त्वचा बेदाग आणि सुंदर होते.
 
चेहरा डागरहीत किंवा सुंदर हवा अशी इच्छा असेल तर बादाम तेलाचे काही थेंब नाभी मध्ये लावल्यामुळे चेहरा उजळतो आणि तेज येतो.
 
नारळाचे तेल किंवा ओलिव ओईलचे काही थेंब नाभी वर लावून हळूवार मसाज केल्याने संतती निगडीत समस्या दूर होतात आणि प्रजनन क्षमता वाढते.
 
जर आपल्याला डोळ्यांशी निगडित काही समस्या जाणवत असतील तर आपण आपल्या नाभीवर नारळाचे तेल लावावे. यामुळे डोळ्याची दृष्टी चांगली राहील.
 
 गुडघेदुखीची समस्या सामान्य झाली आहे. अशा परिस्थितीत नाभीवर मोहरीचे तेल लावल्याने सांधे व गुडघेदुखीमध्ये आराम मिळतो.
 
स्त्रिया आणि पुरुष नेहमीच केस गळतीच्या समस्येने त्रस्त असतात. मोहरीचे तेल नियमितपणे नाभीवर लावा आणि मालिश करत रहा. या मुळे हे आपले केस गळणे कमी होईल आणि आपले केस अधिक मजबूत होतील.
 
सॉफ्ट त्वचा हवी असल्यास गायीचे तूप नाभीवर लावावं.