शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (16:41 IST)

रिकाम्या पोटी एक चमचा तुपासह काळी मिरी खा, कोरडा खोकला निघून जाईल

भारतीय मसाले केवळ जेवणाची चवच वाढवत नाहीत तर आरोग्यासाठी असंख्य आरोग्यदायी फायदे देतात. काळी मिरी प्रत्येक घरातील स्वयंपाकघरात आढळते ज्यात चव वाढवण्यासह इतर फायदे देखील आहेत. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फ्लेव्होनॉइड्स आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात जे तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
 
काळी मिरी कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासूनही रक्षण करतेे. तसेच तूप खाल्ल्याने आरोग्यालाही फायदा होतो. अशात काळी मिरी मिसळलेले तूप रोज खाल्ल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळूू शकते. काळी मिरी आणि तूप खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घ्या- 
 
कोरड्या खोकल्यापासून आराम - खोकल्याची समस्या सामान्य असून यावर उपचारासाठी बरीच औषधे असली तरी तुम्ही तूप आणि काळी मिरी यांचीही मदत घेऊ शकता. कोरड्या खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी एक चमचा देशी तूप अर्धा चमचा काळी मिरी मिसळून खा. याने खोकल्याची समस्या दूर होईल.
 
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करा- काळी मिरी आणि तुपाचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. व्हायरसशी लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असणे आवश्यक आहे म्हणून या मिश्रणाचे नियमित सेवन करावे.
 
दृष्टी वाढवण्यासाठी- तूप आणि काळी मिरी यांचे मिश्रण सेवन केल्याने दृष्टी वाढते. यासाठी देशी तुपाचे काही थेंब आणि काळी मिरी पावडर मिसळून रोज सेवन करा.