बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : बुधवार, 17 एप्रिल 2024 (15:52 IST)

उन्हाळ्यामध्ये पायांना येते दुर्गंधी, हे 11 उपाय अवलंबवा

melly Feet Home Remedies: उन्हाळ्याचे दिवस आले की आरोग्याच्या शारीरिक अनेक समस्या समोर येतात. यामधील एक समस्या म्हणजे पायांना येणारा घामाचा वास. घाम आणि उन्हामुळे पायांवर बॅक्टीरिया जमा होतो. ज्यामुळे दुर्गंध यायला लागतो. ही समस्या चार लोकांमध्ये आपल्याला मान खाली घालण्यास लावू शकते. अश्यावेळेस गरजेचे आहे की, घरगुती उपायांनी तुम्ही ही समस्या दूर करू शकतात. 
 
पायांना दुर्गंधी येते- 
1. घाम- उन्हाळ्यामध्ये बॅक्टेरिया पायांवर जमा होतो आणि दुर्गंधी यायला लागते. 
 
2. चुकीचे शूज- असे शूज घालावे ज्यामधून हवा येण्यास मार्ग राहील. उन्हाळ्यात पायांना घाम जास्त प्रमाणात येतो त्यामुळे दुर्गंधी येते  
 
3. अस्वच्छता- पायांना नेहमी स्वच्छ ठेवावे, स्वच्छ ठेवले नाही तर दुर्गंधी येते 
 
4. फंगल इन्फेक्शन- पायांमध्ये फंगल इन्फेक्शन झाल्यास दुर्गंधी येते. 
 
5. इतर कारण-  काही औषधांचे साइड इफेक्ट, हार्मोन बदलणे आणि काही आजार या कारणांमुळे पायांना दुर्गंधी येते. 
 
Smelly Feet Home Remedies- पायांची दुर्गंधी दूर ठेवण्यासाठी उपाय 
१. पायांना नियमित धुवावे- दिवसातून कमीत कमी दोन वेळेस  पायांना पाण्याने धुवावे. पायांच्या बोटातील गॅप हे देखील स्वच धुवावे. 
 
2. अँटीबॅक्टीरिअल साबणाचा उपयोग करावा- पायांना धुण्यासाठी अँटीबॅक्टीरिअल साबणाचा उपयोग करावा. यामुळे बॅक्टीरिया नष्ट व्हायला मदत होईल. 
 
3. पायांना चांगल्या प्रकारे वाळवावे- पायांना धुतल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे धुवावे. ओल्या पायांवर बॅक्टीरिया लवकर निर्माण होतो. 
 
4. पायांना हवा लागेल असे शूज घालावे- असे शूज घालावे ज्यामध्ये पायांना श्वास घ्याल जागा राहील तसेच हवा जायला जागा राहील.  
 
5. पायमोजे बदलावे- नियमित पायमोजे बदलावे तसेच कॉटन चे पायमोजे घातल्याने ते घामाचा ओलावा शोषून घेतात. 
 
6. बेकिंग सोडा वापरावा- बेकिंग सोडा एक नैसर्गिक डियोड्रेंट आहे. पायांना धुतल्यानंतर त्यांच्यावर थोडा बेकिंग सोडा शिंपडावा. यामुळे पायांना येणारी दुर्गंधी दूर होईल. 
 
7. व्हिनेगरचा उपयोग करावा- व्हिनेगर मध्ये अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. एक बदली पाण्यामध्ये एक कप व्हिनेगर मिक्स करावे आणि त्यामध्ये आपले पाय 15-20 मिनट पर्यंत ठेवावे. यामुळे दुर्गंधी दूर होईल. 
 
8. टी ट्री ऑइलचा उपयोग करावा- टी ट्री ऑइल मध्ये अँटीफंगल गुण असतात  एका बदलीमध्ये काही थेंब टी ट्री ऑइल मिक्स करावे आणि त्यामध्ये पायांना 10-15 मिनट पर्यंत ठेवा. यामुळे फंगल इन्फेक्शन दूर होण्यास मदत मिळेल. 
 
9. लिंबाचा उपयोग करावा- लिंबामध्ये अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. पायांना धुतल्यानंतर त्यांवर लिंबाचा रस लावावा. यामुळे दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल. 
 
10. तुरटीचा उपयोग करा- तुरटीमध्ये अँटीबॅक्टीरिअल गुण असतात. पायांना धुतल्यानंतर त्यांवर तुरटीची पावडर लावावी.  यामुळे पायांना येणारी दुर्गंधी दूर होईल. 
 
11. चहा पावडरचा उपयोग्य करावा-  चहापावडरमध्ये टॉनिक एसिड असते. जे बॅक्टीरिया नष्ट करण्यास मदत करतात. एक बादलीमध्ये एक कप चहा पावडर उकळून टाकावी. व त्यामध्ये आपले पाय 15 ते 20 मिनिटापर्यंत ठेवावे. यामुळे खूप फायदा होईल व पायाची दुर्गंधी कमी होईल. 
 
जर तुम्हला डायबिटीज किंवा इतर काही आजार असेल, तर पायांच्या काळजीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पायांना दुर्गंधी येण्याबरोबर जर पाय लाल होत असतील, सूज येत असेल किंवा वेदना होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या 
माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा
 
Edited By- Dhanashri Naik