आयुर्वेदने शारीरिक दुर्बलतेवर मात करा!
या जगामध्ये पूर्णपणे सुखी असा मनुष्य मिळणे कठीणच आहे. काही लोकांजवळ भरपूर धन असते, परंतु शरीर रोगांचे आगार असते. आरोग्य चांगले आहे, शरीर धडधाकट आहे पण घरी आठराविश्व दारिद्य्र आहे, असेही अनेकजण आहेत.
काहीही असले तरी प्रतिकूल परिस्थितीपुढे हतबल न होणे, हेही माणसाचेच वैशिष्ट्य होय. शारीरिक दुर्बलता ही अनुवांशिक किंवा खानदानी असल्याचा अनेकांचा समज असतो. परंतु आशावादी आणि साहसी लोक असे मानत नाहीत. आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योग यांच्या एकत्रित प्रयत्नातून दुबळ्या शरीराला शक्तीशाली, धडधाकट बनविण्याचे उपाय शोधले गेले आहेत. करून पाहा हे साधे सोपे उपाय...
- अश्वगंधा आणि शतावरी चूर्ण यांचे मिश्रण दरोरोज एक चमचा दुधासोबत झोपण्यापूर्वी घ्या.
- दुधात उकळून रोज 5 खारीक खा.
- एका पेल्यात दोन चमचा मध मिसळून दररोज सेवन करा.
- भोजनात सॅलड, मोड आलेले कडधान्य, फळे आदींचा समावेश करा.
- शक्य झाल्यास चहा, कॉफी, तंबाखू, गुटखा, सिगारेट आणि दारू यापासून दूर राहा.
दृढ संकल्प करून वरील नियम पाळत थंडीच्या दिवसात फक्त 90 दिवस व्यायाम करा आणि पाहा तुमच्या शरीरातील दुर्बलता जाऊन तुम्ही धट्टेकट्टे होता की नाही ते.