गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

थंड आणि बहुपयोगी वाळ्याचे औषधी गुणधर्म…

उन्हाळा सुरू होताच आपण विविध थंड पेयांकडे वळतो. बाजरात मिळणारे विविध पेय अनेकदा आरोग्यास हितकारक असतीलच, असे नाही. आपल्या आयुर्वेदात सांगितल्यानुसार लिंबू, चंदन, कैरी, वाळा यांची पेय उन्हाळ्यात शीतल मानली जातात. बहुगुणी आणि उष्णतेच्या विकारांपासून आपल्या शरीराचे रक्षण करणाऱ्या वाळा या घटकाबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.
 
-उन्हाळ्यात माठात वाळा टाकल्यास पाण्याला छान सुगंध येतो आणि पाण्यातील दोष निघून जाण्यासही मदत होते.
 
-वाळ्याचे पाणी उष्णतेचे विकार दूर करणारे आहे. तसेच हे पाणी थंड व सुगंधी होते.
 
-वाळ्याचे पडदे करून त्यावर पाणी मारलं तर सभोवती गारवा वाटतो.
 
-अंगाची आग होणे, अंगातील उष्णता यावर वाळ्याचे चूर्ण घ्यावे. लघवीच्या, किडनीच्या आजारांवर वाळ्याचा चांगला उपयोग होतो.
 
-मूत्र विसर्जनावेळी आग, जळजळ होणे, प्रमाण कमी होणे यावर वाळ्याचा उत्तम उपयोग होतो.
 
-घामोळ्या, अंगावर पित्त येणे त्वचेवर लाल चट्टे येणे यावर वाळ्याच्या चूर्णाचा लेप लावतात.
 
-त्वचारोग, त्वचेची आग होणे, त्वचेची आग होणे, तारुण्यपिटीका यासाठी वाळा चूर्णाचा इतर चूर्णांबरोबर वापर करतात
 
-अंगाला घाम जास्त येत असल्यास, घामाला दुर्गंधी येत असल्यास वाळ्याचे चूर्ण अंगाला लावावे.