शनिवार, 3 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (15:02 IST)

चमेलीच्या फुलांनी वाढवा चेहर्‍याची चमक

increase
चमेलीचे फुलं जेथे सुगंध देते तसेच सुंदरता निखरण्यासाठी देखील फार प्रभावशाली आहे. 
 
चमेलीचे फुल जेथे सुगंध देतात, तसेच यांना आजारपणात देखील उपयोगी मानण्यात आले आहे. आयुर्वेदानुसार चमेली स्वादामध्ये कडू असते, पचण्यात हलकी, तासीर गरम आणि कफ व पित्तनाशक असते. जाणून घ्या त्याच्या फायद्यांबद्दल-- 
 
चेहर्‍यावर नेमाने चमेलिच्या फुलांचा रस लावल्याने चमक वाढते.  
चमेलीच्या फुलांची दांडी व मिश्री समान अनुपातमध्ये घेऊन त्याचे सेवन केल्याने डोळ्यांवर लावल्याने थकवा दूर होतो. 
चमेलीच्या फुलांना वाटून लेप तयार करून तो दाद, खाज आणि त्वचा रोगावर लावल्याने आराम मिळतो.  
जुने डोकदुखी असल्यास चमेलीच्या फुलांचा लेप डोक्यावर लावल्याने डोकेदुखीत आराम मिळतो. 
चमेलीच्या पानांना तोंडात ठेवून पानासारखे चघळल्याने तोंडाचे छाले, जखम व या अंगाशी निगडित सर्व रोगांपासून मुक्ती मिळते. 
डोळ्यांचे दुखणे असेल तर चमेलीच्या फुलांचा लेप लावावा, फायदा होईल. 
चमेलीच्या पानांना वाटून प्यायल्याने पोटाचे किडे नष्ट होतात.