बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 जुलै 2024 (08:50 IST)

अनेक गंभीर आजार होतील दूर फक्त एक चमचा धणे, केव्हा आणि कसे करावे सेवन जाणून घ्या

Coriander seeds
Coriander Seeds Benefits: मसाल्यांमध्ये येणारे धणे हे मसाल्यांपैकीच एक पदार्थ आहे. धणे पूड किंवा कोथिंबीर जेवणाची चव तर वाढवतात. तसेच अनेक पदार्थांमध्ये धणे वापरले जातात. धण्यांमध्ये अनेक औषधीय गुण असतात. तर चला जाणून घेऊ या आरोग्यवर्धक धणे कसे अनेक आजार दूर ठेवतात.
 
धणे सेवनाचे फायदे- 
डायबिटीज नियंत्रित- डायबिटीजला घरगुती उपायांनी नियंत्रित केले जाऊ शकते. धण्यांमध्ये असे कंपाउंड असतात जे अँटी-हाइपरग्लाइकेमिक, इंसुलिन डिस्चार्जिंग आणि इंसुलिन गती निर्माण करतात. ज्यामुळे शरीरात ग्लुकोजचे प्रमाण योग्य प्रमाणात राहते.
 
कोलेस्ट्रॉल नियंत्रित- कोलेस्ट्रॉलचे वाढणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच हृदय संबंधित अनेक आजार निर्माण होण्याची शकयता असते. हाय कोलेस्ट्रॉलने स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. अशामध्ये कोलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यासाठी तुम्ही धणे उपयोगात आणू शकतात. धण्यांमध्ये कोरिएन्ड्रिन नावाचे कंपाउंड असते. ज्यामुळे लिपिड पाचनची प्रक्रिया नियंत्रित राहते आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. 
 
पाचन मजबूत करते- धणे डाइटरी फाइबरचे सोर्स असतात. जे अँटी-ऑक्सीडेंट गुणांनी भरपूर असतात. लिव्हर सुरक्षित ठेवणे याकरिता धणे मदत करतात. ज्या लोकांना अपचनाची समस्या असेल त्यांनी धणे घातलेले पाणी सेवन करावे.  
 
त्वचेच्या आजारांना दूर ठेवते- धणे त्वचा आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करता. यामुळे एक्जिमा, खाज, पुरळ आणि सुजणे यांसारख्या समस्या लवकर ठीक होतात. धण्यांमध्ये अँटीसेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तोंडातील छाले देखील बरे होण्यास मदत मिळते. 
 
केसांसाठी फायदेशीर- केस गळत असतील किंवा अशक्त झाले असतील तर धणे यासाठी फायदेशीर असतात. धण्यांचा उपयोग नवीन केस येण्यासाठी देखील केला जातो.  
 
कसा करावा उपयोग-
धणे पासून निर्माण होणारी हिरवी कोथिंबीर आहारामध्ये सहभागी करावे. तसेच पदार्थ बनवतांना धणे पूड नक्की वापरावी. तसेच धणे घातलेले पाणी सेवन करावे. रात्री एक ग्लासमध्ये धणे भिजवून सकाळी हे पाणी गाळून सेवन करावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik