थंडीत लोणी का खावे?
हिवाळ्यात आहाराच्या सवयीत बदल करावा लागतो, कारण पोटाला उष्णतेची गरज असते. त्यामुळे बहुतेकांच्या घरी गरम गरम भाकरी, भाजी आणि लोणी असा बेत होतो. सध्याचा जमाना मोजून खाण्याचा म्हणजे कॅलरी कॉन्शस असण्याचा आहे. त्यामुळेच हल्ली लोक लोणी, तूप सेवन करण्यास नकारच देतात. परंतु हिवाळ्यात लोणी सेवन करणे हे आरोग्याला लाभदायीच असते. अर्थात लोणी खातानाही आरोग्याची काळजी घेण्यासाठी बाजारातील बटर न खाता घरी दह्या ताकापासून केलेले पांढरे लोणी जरूर खाऊ शकता. बाजारातील लोणी न खाण्याचे कारण म्हणजे त्यात असणारे मीठ. अतिमीठ असल्याने ते आरोग्यासाठी फारसे चांगले नसते. घरी काढलेले लोणी हे योग्य प्रक्रियेतून काढलेले असल्याने ते अर्थातच आरोग्यवर्धक असते. हिवाळ्यात पांढरे लोणी खाण्याचे फायदे जाणून घेऊया.
तयार लोणी नको- बाजारात मिळणारे तयार लोण्यामध्ये मीठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे नियमितपणे त्याचे सेवन केल्यास शरीरात अतिरिक्त मीठ जाऊ शकते आणि रक्तदाब वाढू शकतो. घरच्या लोण्यामध्ये मीठ नसते, अगदीच गरज लागल्यास प्रत्येक व्यक्ती त्याला हवे तितके मीठ घेऊ शकते. घरी काढलेल्या पांढर्या लोण्यात मीठ मिसळण्याची गरज नसते कारण ते तसेच चवदार लागते.
ट्रान्स फॅट कमीच- घरी काढलेल्या लोण्यामध्ये चरबीचे किंवा मेदाचे प्रमाण असते, परंतु ते आरोग्यासाठी चांगले असते. तुलनेत बाजारातील बटरमध्ये ट्रान्स फॅट किंवा मेदाचे प्रमाण अधिक असते. घरी काढलेल्या लोण्यातील ट्रान्स फॅट वजन कमी करण्यास मदत करतात.
उष्मांकांचे प्रमाण कमीः घरी तयार केलेले लोणी आणि बाजारातील तयार लोणी या दोन्हींमध्ये उष्मांकांचे प्रमाण अधिक असते. परंतु तुलनेत बाजारातीललोण्यामध्ये केवळ उष्मांक किंवा कॅलरी असतात तर पांढर्या लोण्यामध्ये जीवनसत्त्व आणि खनिजेदेखील असतात. जी आरोग्यासाठी चांगली असतात.
लोण्यामध्ये संपृ्रत मेद - घरात जे पांढरे लोणी काढतो त्यात संपृ्रत वसा किंवा मेद असतेच. त्याचा संबंध वाढत्या हृदय रोगाची वाढती जोखीमीशी लावू शकतात. परंतु ही गोष्ट सत्य नसल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. अर्थात लोण्याचे सेवन करण्याचा सल्ला देत असताना ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे. संपृ्रत मेद किंवा चरबी ही पांढर्या लोण्यातील चरबीप्रमाणे हृदय रोग आणि स्ट्रोक किंवा लकवा या विकारांमध्ये संरक्षणात्मक प्रभावच पाडतात.
लोणी कसे काढावेः घरी लोणी काढण्याची प्रक्रिया सोपी आहे. रोज दूध तापवल्यानंतर गार झाले की त्याची साय एकाच भांड्यात काढून घ्यावी. पुरेशी साय जमा होईपर्यंत म्हणजे दोन तीन कप साय जमा होईल एवढी साय एकत्र त्याच भांड्यात साठवावी, ती फ्रीजमध्ये ठेवावी. पाहिजे तेवढी साय जमा झाल्यानंतर ती बाहेर काढून त्याला विरजण लावून ती एक रात्र बाहेरच ठेवावी. त्यानंतर दुसर्या दिवशी सर्वसाधारण तापमानाला आल्यानंतर साय मिक्सरमध्ये फिरवावी किंवा रवीने घुसळावी. मगथोडे पाणी घातले की लोणी वर येऊ लागते.
वरील प्रक्रियेने उत्तम गुणवत्तेचे लोणी तयार होते. हे लोणी आपल्या डोळ्यासमोर तयार होते त्यामुळे भेसळ असण्याचाही संभव नाही. असे पांढरे लोणी हिवाळ्यात सेवन केल्यास आरोग्य चांगले राहाते. घरी काढलेल्या पांढर्या लोण्याचे फायदेही आता आपण पाहिले आहेत. त्यानुसार थंडीच्या काळात पांढर्या लोण्याचे जरूर सेवन करावे.
डॉ. भारत लुणावत