नातवंड.......
नातवंड म्हणजे काय चीज असतं ,
आजी आजोबा मध्ये दडलेलं सँडविच असतं.
नातवंड म्हणजे काय चीज असते ,
आई रागावली की आजी कडील धाव असते.
नातवंड म्हणजे लोण्याचा गोळा,
पाळण्यातून अलगद काढून घ्यावा.
नातवंड म्हणजे गुलाबाची पाकळी
पुस्तकात जपलेली पानावरची जाळी.
नातवंड म्हणजे विड्यातला गुलकंद सगळ्या चवींना बांधतो एक संध.
नातवंड म्हणजे खव्याचा पेढा
अखंड आनंद घ्या हवा तेवढा.
नातवंड म्हणजे त्रिवेणी संगम
तिस-या पिढीचा असतो उगम.
नातवंड म्हणजे आनंद तरंग
आनंदाच्या डोहात डुंबते अंतरंग.
सर्व आजी-आजोबांना समर्पित !!