सोमवार, 13 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

माणसं जोडावी कशी?

पुस्तकात सुरुवातीलाच
'माणसं जोडणं म्हणजे काय ?'
याविषयी जे लिहिलंय त्यातल्या काही ओळी खाली देतोय -
 
माणसं जोडणं म्हणजे,
समोरच्याला 'आहे' तसा स्वीकारणं. आपल्या अपेक्षा, आपली मतं न लादणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
ऐकण्याची कला शिकणं. फुकाचा वाद आणि टोकाची टीका टाळणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
माणसांवर 'शिक्के' न मारणं. समोरचा अधिक महत्त्वाचा - हे स्वतः जाणणं आणि त्यालाही ते जाणवू देणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
कौतुकाची संधी न सोडणं, तक्रार मात्र जपून करणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
प्रतिक्रिया नव्हे, प्रतिसाद देणं. रागाचंही रुपांतर लोभात करता येणं...
 
माणसं जोडणं म्हणजे,
इतरांना माफ करता करता स्वतःच मन साफ करणं..
 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
 श्री स्वामी समर्थ