समजुतीचा घोटाळा ... !!
काल मित्राने सांगितलेला भन्नाट किस्सा ...
आमचे शाळेतले मराठीचे शिक्षक एकदा त्याच्या ऑफिसवर आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग गाडी संसाराकडे वळाली.
सरांनी याला विचारलं ," मुलं बाळं काय ?
" हा म्हणाला " दोन, पहिलीला एक अन दुसरीला एक "
याचं उत्तर ऐकुन सरांच्या चेहेर्यावरचे भाव बदलले.
दोन मिनिटांनी याची ट्युब पेटली कि सरांचा गैरसमज झालाय आणि सरांना त्याने खुलासा केला
"म्हणजे तसं नाही काही सर ,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एक पहिलिच्या वर्गात आहे आणि एक दुसरीच्या .!"
मग सर जरा ताणातुन मोकळे झाले आणि खुलुन हसले .. !
खरंच अवघड आहे मराठी भाषा समजणं ! कशीही वळते !